Auto Expo 2020: टाटा मोटर्सकडे पाऊले वळू लागली; आहेत एका पेक्षा एक देखण्या एसयुव्ही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 03:10 PM2020-02-05T15:10:06+5:302020-02-05T15:13:55+5:30

Auto Expo 2020 मध्ये टाटा मोटर्सच्या पॅव्हेलिअनकडे अनेकांची पावले वळू लागली आहेत. कारणही तसेच आहे. टाटाने हॅरिअरचे बीएस6 मानकांमधील मॉडेल लाँच केले आहे. तर आणखी एक कार 7-सीटर एसयूव्ही Gravitas ही आकर्षण आहे. याचबरोबर आणखी काही लक्ष वेधून घेणाऱ्या कार टाटाने प्रदर्शनात ठेवल्या आहेत.

टाटाने मिनी एसयुव्ही Tata HBX चे जवळपास प्राडक्शन मॉडेल लाँच केले आहे. याचबरोबर Tata Sierra चे इलेक्ट्रीक मॉडेलही ठेवले आहे. टाटाने आज हॅरिअर लाँच केली.

या एसयुव्हीची किंमत 13.69 लाखांपासून 20.25 लाखांपर्यंत ठेवण्यात आली आहे. यामध्ये मॅन्युअल, अॅटोमॅटीक, ड्युअल टोन आणि डार्क रंगामध्येही ही कार उपलब्ध करण्यात आली आहे.

यानंतर टाटाने हैरियर एसयूव्हीची 7 सीटर कार आणली आहे. या कारला बझार्डम्हणून टाटाने जिनिव्हा एक्स्पोमध्ये दाखविले होते. या एसयुव्हीची लांबी हॅरिअरच्या तुलनेत वाढविण्यात आली आहे. या कारमध्ये बीएस 6 चे 2.0 लीटरचे इंजिन देण्यात येणार आहे जे हॅरिअरमध्येही आहे.

टाटाची तिसरी कारही आकर्षण राहिली आहे. ही मिनी एसयुव्ही आहे. ही कार नेक्सॉनपेक्षा कमी किंमतीत बाजारात आणण्यात येणार आहे.

यामध्ये ह्रॅरिअरसारखे डीआरएल देण्यात आले आहेत. यामध्ये टाटाच्या नव्या इम्पॅक्ट 2.0 चा बेस देण्य़ात आला आहे.

टाटाची 90 च्या दशकातील सियारा एसयुव्ही पुन्हा एकदा भारतीय रस्त्यांवर धावण्यासाठी तयार झाली आहे. टाटाने सियाराचे इलेक्ट्रीक मॉडेल दाखविले आहे.

महत्वाचे म्हणजे ही तीन दरवाजांची कार आहे. उजव्या बाजुला मागे दरवाजाच दिलेला नाही.

तसेच या कारचे इंटेरिअरही सर्वात वेगळे आहे. यामध्ये रिअर बेंचसोबत लाऊंजसारखा एरिआ देण्यात आला आहे.