much awaited Kia Carnival MPV launched; Like a middle class limousine | Auto Expo 2020 : बहुप्रतीक्षित Kia Carnival MPV आली; मध्यमवर्गाची लिमोझिनच जणू

Auto Expo 2020 : बहुप्रतीक्षित Kia Carnival MPV आली; मध्यमवर्गाची लिमोझिनच जणू

किया मोटर्सने नोएडातील ऑटो एक्स्पोमध्ये Carnival MPV ही भारतातील सर्वात लांब कार लाँच केली आहे. ही कार टोयोटाच्या इनोव्हाला कडवी टक्कर देणार आहे. कारण या कारमधील सोई सुविधा आणि किंमत पाहता 22 लाखांची इनोव्हा खूपच मागे असल्याचे वाटणार आहे. 


नोएडामध्ये आज ऑटो एक्स्पोला सुरूवात झाली. कियाला भारतात येऊन अवघे काही महिनेच झालेले आहेत. कियाच्या सेल्टॉसला चांगला प्रतिसादही मिळाला आहे. यामुळे कियाने भारतात आणखी उत्पादने आणण्याचे ठरविले आहे. कार्निव्हल या कारमध्ये ड्युअल पॅनल इलेक्ट्रॉनिक सनरूफ देण्यात आलेला आहे. जे भारतातील कोणत्याही कारमध्ये नाही. याचसोबत कंपनीने आज सोनेट की कॉम्पॅक्ट एसयुव्हीचे प्रारुपही दाखविले आहे. 


Carnival MPV मध्ये व्हीआयपी सीट्स विथ एन्टरटेन्मेंट, वन टच पॉवर स्लायडिंग डोअर, पॉवर टेलगेट अशी भन्नाट फिचर्स आहेत. यामध्ये 27 स्मार्ट कनेक्टेड फिचर्स असून ही एमपीव्ही 3 व्हेरिअंटमध्ये येणार आहे. 


Kia Carnival मध्ये 202 लीटरचे डिझेल 4 सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 198 एचपी ताकद आणि 440 एनएमचा टॉर्क उत्पन्न करते. यामध्ये 8 स्पीड ऑटोमॅटीक ट्रान्समिशन मिळणार आहे. आणखी एक भन्नाट फिचर म्हणजे या कारमध्ये लॅपटॉप किंवा तत्सम उपकरणही चार्ज करता येणार आहे. 


Auto Expo 2020 : मारुती तब्बल 17 कार दाखविणार; पेट्रोलवर 32 किमी धावणारी स्विफ्ट आणणार

किया मोटर्स पहिल्यांदाच ऑटो एक्स्पोमध्ये सहभागी झाली आहे. सोनेट ही कंपनीची पुढील कॉम्पॅक्ट एसयुव्ही असणार आहे. कार्निव्हलची किंमत 24. 95 लाखांपासून सुरू होत असून 7, 8 आणि 9 सीटर अशीही ही एमयुव्ही मिळणार आहे. सर्वात महाग मॉडेल लिमोझिनची किंमत 33.95 लाख रुपये ठेवण्यात आले आहे. 

Web Title: much awaited Kia Carnival MPV launched; Like a middle class limousine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.