Apple iPhone उत्पादन करणारी कंपनी भारतात Electric Car तयार करण्याच्या तयारीत, पाहा काय आहे प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 04:47 PM2021-10-20T16:47:17+5:302021-10-20T16:47:48+5:30

जागतिक बाजारपेठेत Electric Vehicle मार्केटमध्ये एक प्रमुख स्पर्धक म्हणून पुढे येणं हा त्यांचा मुख्य उद्देश आहे.

apple iphone maker Foxconn plans to make electric vehicles in india know details | Apple iPhone उत्पादन करणारी कंपनी भारतात Electric Car तयार करण्याच्या तयारीत, पाहा काय आहे प्लॅन

Apple iPhone उत्पादन करणारी कंपनी भारतात Electric Car तयार करण्याच्या तयारीत, पाहा काय आहे प्लॅन

googlenewsNext
ठळक मुद्देजागतिक बाजारपेठेत Electric Vehicle मार्केटमध्ये एक प्रमुख स्पर्धक म्हणून पुढे येणं हा त्यांचा मुख्य उद्देश आहे.

तैवानची टेक कंपनी फॉक्सकॉन युरोप, भारत आणि लॅटिन अमेरिकेत इलेक्ट्रीक वाहनांचं (Electric Vehicle) उत्पादन करण्याच्या विचारात आहे. दरम्यान, यामध्ये जर्मन कार उत्पादकांही उप्रत्यक्षरित्या सहभागी होणार आहेत. कंपनीचे अध्यक्ष लियू यंग-वेई यांनी बुधवारी ही माहिती दिली.

फॉक्सकॉन या कंपनीला औपचारिक पद्धतीनं होन हाय प्रिसिजन इंडस्ट्री कंपनी लिमिटेड या नावानं ओळखलं जातं. जागतिक बाजारपेठेत Electric Vehicle मार्केटमध्ये एक प्रमुख स्पर्धक म्हणून पुढे येणं हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. तसंच US स्टार्टअप फिस्कर inc थायलँडचा प्रमुख एनर्जी ग्रुप PTT PCL यांच्यासोबत त्यांनी करारही केला आहे. सोमवारी तीन EV प्रोटोटाईपची घोषणा केल्यानंतर ताइपेमध्ये एका बिझनेस फोरममध्ये लियू यांनी माध्यमांशी संवाद साधला. डिस्क्लोझर निर्बंधांमुळे आपण सध्या युरोप, भारत आणि लॅटिन अमेरिकेतील योजनांबद्दल अधिक माहिती देऊ शकत नाही असं ते म्हणाले. 

दरम्यान, यावेळी त्यांना जर्मन कार उत्पादक कंपन्यांच्या सहकार्याबद्दल विचारण्यात आलं. यावेळी त्यांनी पहिल्यांदा याची सुरूवात युरोपमध्ये केली जाईल, त्यानंतर भारत आणि लॅटिन अमेरिका, तसंच त्यानंतर मॅक्सिकोमध्ये शक्यता असल्याचं त्यांनी नमूद केलं. मे महिन्यात फॉक्सकॉन आमि कार उत्पादक कंपन्या स्टेलंटिसनं ऑटो इंडस्ट्रीमध्ये कार आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी सप्लायसाठी एक जॉईंट व्हेन्चर सुरू करण्याची घोषणा केली होती. फॉक्सकॉननं याच महिन्यात इलेक्ट्रीक कारच्या उत्पादनासाठी अमेरिकन स्टार्टअप लॉर्डस्टाऊन मोटर्स कॉर्पकडून एक कंपनीही विक घेतली होती. तसंच भविष्यात ऑटो चिप्सची वाढती मागणी पाहून ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी तैवानमध्ये एक चिप प्लांटही विकत घेतला होता. 

Web Title: apple iphone maker Foxconn plans to make electric vehicles in india know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.