थरकाप उडवणारा VIDEO! दुसरी एखादी कार असती तर गेला असता जीव; आनंद महिंद्रांनी केलं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 16:54 IST2022-03-26T16:52:53+5:302022-03-26T16:54:27+5:30
या व्हिडिओमध्ये महिंद्रा XUV700 आणि तामिळनाडू परिवहन बसची जोरदार धडक झाल्याचे दिसत आहे. ही धडक एवढी जबरदस्त होती की, बसची दिशाच बदलली.

थरकाप उडवणारा VIDEO! दुसरी एखादी कार असती तर गेला असता जीव; आनंद महिंद्रांनी केलं कौतुक
नवी दिल्ली - महिंद्रा कार सध्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वोत्तम फिचर्स देत असल्याचे, नुकत्याच समोर आलेल्या एका सीसीटीव्ही फुटेजवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. हा व्हिडिओ शेअर करत आनंद महिंद्रा यांनी XUV700 चे जोरदार कौतुक केले आहे.
या व्हिडिओमध्ये महिंद्रा XUV700 आणि तामिळनाडू परिवहन बसची जोरदार धडक झाल्याचे दिसत आहे. ही धडक एवढी जबरदस्त होती की, बसची दिशाच बदलली. यावरून महिंद्रा XUV700 सुरक्षिततेच्या दृष्टीने केवढी जबरदस्त असेल, याचा अंदाज येऊ शकतो. तसेच यावरून महिंद्राच्या गाड्यांची बिल्ड क्वालिटीही जबरदस्त असल्याचे स्पष्ट होते. कारण कारच्या धडकेने एवढ्या मोठ्या बसची दिशा बदलणे ही मोठी गोष्ट आहे.
दुसरी एखादी गाडी असती तर जीव गेला असता! -
या गाडीच्या ऐवजी दुसरी एखादी गाडी असती तर, पुढच्या दोन प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असती अथवा त्यांचा मृत्यूही झाला असता. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत आनंद महिंद्रा यांनी लिहिले, “सर्व प्रथम प्रवासी सुखरूप असल्याचा मला आनंद आहे. सुरक्षितता हे आमच्या सर्वच वाहनांचे सर्वात महत्वचे डिझाईन ऑब्जेक्ट आहे. नव्या वाहनांनी या फिलॉसॉफीला बळ दिले आहे. मी माझ्या टीमचे कोतुक करतो, ज्यांनी डिझाईनवर एवढी मेहनत घेतली आणि भविष्यात ते हे आणखी चांगले बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतील.”
First, I’m grateful that the passengers were unhurt. Safety is the predominant design objective in all our vehicles. This news item reinforces that philosophy.I’m grateful to our team for walking the talk in their designs & I hope this inspires them to rise even further https://t.co/bkSXxJT4U4
— anand mahindra (@anandmahindra) March 25, 2022
सुरुवातीची किंमत 11.99 लाख रुपये -
भारतात बिलकूल नव्या असलेल्या XUV700 ची जोरदार विक्री होत आहे आणि कंपनीने हिची सुरूवातीची एक्सशोरूम किंमत 11.99 लाख रुपये एवढी ठेवली आहे. सध्या हे मॉडेल - MX, AX3, AX5 आणि AX7 या 4 व्हेरिअंट्समध्ये विकले जात आहे. AX7 हे मॉडेल लक्झरी पॅकसह देखील येते.