'पुष्पा'च्या कार कलेक्शनमध्ये 'चालतं-फिरतं घर'ही, तुम्हीही म्हणाल, 'झुकेगा नहीं'! किंमत जाणून थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 18:58 IST2024-12-13T18:56:58+5:302024-12-13T18:58:21+5:30
या व्हॅनिटीमध्ये आरामदायी मसाज सीटसह विश्रांतीसाठी स्पेसही देण्यात आली आहे. जेथे शूटनंतर आरामही केजा जाऊ शकतो. हिच्या मध्ये लेदर सीट्स, जाईंट मिरर आणि मून लाइटिंगचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. ही सर्व वैशिष्ट्ये पंचतारांकित हॉटेलमधील एखाद्या रूम प्रमाणे आहेत. यात एक छोटे बाथरूमही आहे.

'पुष्पा'च्या कार कलेक्शनमध्ये 'चालतं-फिरतं घर'ही, तुम्हीही म्हणाल, 'झुकेगा नहीं'! किंमत जाणून थक्क व्हाल
'पुष्पा 2' चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर, साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन पुन्हा एकदा चर्चेत आहे. खरे तर, या चेंगराचेंगरीत एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी त्याला अटकही करण्यात आली. त्याच्या 'पुष्पा 2' चित्रपटाने नुकताच 1100 कोटींहून अधिकचा व्यवसायही केला आहे. महत्वाचे म्हणजे, अल्लू कमाईसोबतच पैसा खर्च करण्यातही मागे नाही. तो प्रामुख्याने वाहनांवर बराच पैसा खर्च करतो. त्याच्याकडे अनेक आलिशान वाहनं आहेत. त्यात व्हॅनिटी व्हॅनचाही समावेश आहे. ही व्हॅनिटी एखाद्या चालत्या फिरत्या घरापेक्षा कमी नाही.
अल्लू अर्जुनच्या व्हॅनिटी व्हॅनचे नाव फाल्कन असे आहे. जी आपल्या आवश्यकतेनुसार कस्टमाइजही केली जाऊ शकते. हिची किंमत 7 कोटी रुपये एवढी असल्याचे सांगण्यात येते. ही व्हॅन सर्व सुविधांनी सज्ज आहे. ती एखाद्या पंचतारांकित हॉटेलच्या रूम प्रमाणे दिसते. या व्हॅनवर अभिनेत्याच्या नावाचा लोगोदेखील आहे, यावर 'AA' पाहू शकता. ही व्हॅनिटी बाहेरून पूर्णपणे काळ्या रंगाची आहे. हिच्या आत उबर-कूल इंटिरियर दिसू शकते. यात सिल्व्हर आणि व्हाइट इंटीरियर थीम आहे.
या व्हॅनिटीमध्ये आरामदायी मसाज सीटसह विश्रांतीसाठी स्पेसही देण्यात आली आहे. जेथे शूटनंतर आरामही केजा जाऊ शकतो. हिच्या मध्ये लेदर सीट्स, जाईंट मिरर आणि मून लाइटिंगचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. ही सर्व वैशिष्ट्ये पंचतारांकित हॉटेलमधील एखाद्या रूम प्रमाणे आहेत. यात एक छोटे बाथरूमही आहे. अल्लूने स्वतः त्याच्या व्हॅनिटी व्हॅनचे फोटो सोशल मीडियावरही शेअर केले आहेत.
याशिवाय, अल्लूच्या गॅरेजमध्ये रोल्स रॉयस कुलीनन देखील आहे. हिची किंमत 6.95 कोटी रुपये एवढी असल्याचे सांगण्यात येते. या ऑल व्हील ड्राइव्ह कारमध्ये 8 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. त्याच्याकडे काळ्या रंगाची Hummer H2 देखील आहे. मात्र, हे कोणते मॉडेल आहे याबाबत माहिती समोर आलेली नाही. अल्लूकडे सुमारे 99.5 लाख रुपयांची Jaguar XJL देखील आहे. आता ही कार भारतात बंद करण्यात आली आहे. यासोबतच त्याच्याकडे 1.78 कोटी रुपयांची रेंज रोव्हर व्होग आणि व्होल्वोची XC90 T8 एक्सलन्स देखील आहे. ही 4 सीटर लक्झरी एसयूव्ही आहे.