शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

मारुतीनंतर आता ही मोठी कंपनी करणार डिझेल कारना 'टाटा'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 12:43 PM

कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार BS-VI उत्सर्जन मानकांमुळे डिझेलचे इंजिने महाग होणार आहेत.

नव्या प्रदूषण नियमावलीनुसार बीएस 6 श्रेणीतील डिझेल इंजिन तयार करणे परवडणारे नसल्याने मारुतीने डिझेलच्या कार बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आता यामध्ये आणखी एका मोठ्या भारतीय कंपनीने नंबर लावला आहे. छोट्या कारमधील डिझेल इंजिने बंद करण्याची घोषणा केल्यानंतर टाटा मोटर्सचे शेअर्स 4 टक्क्यांनी घसरले आहेत. 

कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार BS-VI उत्सर्जन मानकांमुळे डिझेलचे इंजिने महाग होणार आहेत. यामुळे ग्राहक त्याकडे पाठ फिरवतील. देशातील सर्वात मोठी कंपनी मारुतीने गेल्या आठवड्यात 1 एप्रिल 2020 पासून डिझेलच्या कार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. महत्वाचे म्हणजे 1 एप्रिल 2020 पासून ही नवी नियमावली सुरु होणार आहे. 

टाटा मोटर्सकडे एन्ट्री लेव्हल हॅचबॅक Tiago मध्ये 1 लीटरचे डिझेल इंजिन देण्यात येते. हे तीन सिलिंडर इंजिन असल्याने आवाजही खूप येतो. तसेच टिगॉरला 1.5 लीटर, बोल्ट, झेस्ट या मॉडेलनाही जुने इंजिन देण्यात आलेले आहे. या गाड्यांना जर नवे डिझेल इंजिन दिल्यास त्यांच्या किंमती 2 ते 2.5 लाखांनी वाढण्याची शक्यता आहे. असे झाल्यास ते ग्राहकांना परवडणारे नाही. यामुळे 1 एप्रिल 2020 पासून टाटा मोटर्सही डिझेलच्या कार बंद करेल.

Tata Motors चे वाहन विभागाचे अध्यक्ष मयांक पारेख यांनी सांगितले की, छोट्या आणि मध्यम आकाराच्या डिझेल इंजिनच्या कारची मागणी कमी झाली आहे. यामुळे नवीन इंजिन विकसित करण्यासाठीचा खर्च मोठा असणार आहे. पारेख यांनी सांगितेल की, BS-VI इंजिनसोबत छोट्या डिझेल कारचा खर्च वाढेल आणि त्याचा परिणाम थेट ग्राहकांच्या खिशावर होणार आहे. यामुळे वाहनांची मागणी घटेल. 

डिझेल कारचे भविष्यसध्या पेट्रोल आणि डिझेल कारचे आयुष्य १५ वर्षे निर्धारित केलेले आहे. परंतू भविष्यातील हवा प्रदुषणाचा विळखा पाहता हे आयुर्मान दहा वर्षांवर येण्याची दाट शक्यता आहे. दिल्लीत 2000 सीसी पेक्षा जास्त इंजिनाच्या कार बंद करण्यात आल्या आहेत. फरकाचे जादा मोजलेले पैसे वसूल करण्यासाठी दहा वर्षांत प्रत्येक वर्षाला १५ ते २० हजारपेक्षा जास्त किमी कार फिरणे आवश्यक आहे. परंतू, चार-पाच वर्षांतच कार कालबाह्य होत असल्याने ती विकून नवीन घेण्याकडे कल असतो. यानुसार डिझेलची कार हौस भागवणाऱ्यांसाठी खरेच परवडणारी आहे का, हा ही विचार होणे आवश्यक ठरते. भविष्यातील इलेक्ट्रीक कार आणि सीएनजी यामुळे डिझेलची कार खर्चिक ठरण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :TataटाटाMaruti Suzukiमारुती सुझुकीDieselडिझेलAutomobile Industryवाहन उद्योग