GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 20:30 IST2025-09-23T20:29:59+5:302025-09-23T20:30:37+5:30

कमी बजेटमध्ये सुरक्षित आणि प्रीमियम SUV घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे.

After GST reduction, Tata Punch with 5 star rating has become so much cheaper know about the features and details | GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?

GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?

भारतातील बेस्ट-सेलिंग कॉम्पॅक्ट SUV Tata Punch आता आणखी स्वस्त झाली आहे. आधी या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹5,99,990 होती. मात्र, GST 2.0 लागू झाल्यानंतर कंपनीने कारची किंमत कमी करून ₹5,49,990 केली आहे. म्हणजेच ग्राहकांना थेट ₹50,000 रुपयांचा फायदा होत आहे. कमी बजेटमध्ये सुरक्षित आणि प्रीमियम SUV घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे.

प्रीमियम आणि मॉडर्न इंटीरियर -
नवीन Tata Punch 2025 चे इंटीरियर अधिक प्रीमियम बनवण्यात आले आहे. यात, लेदरेट-रॅपड टू-स्पोक स्टीयरिंग व्हील आणि Tata चा इल्युमिनेटेड लोगो देण्यात आला आहे. 10.2-इंचचा मोठा इन्फोटेनमेंट सिस्टम, जो वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto ला सपोर्ट करतो. ड्रायव्हरसाठी 7-इंचांचा डिजिटल TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे, जो सर्व महत्त्वाची माहिती स्पष्टपणे दाखवतो. याव्यतिरिक्त, केबिनमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायरलेस चार्जिंग पॅड आणि फ्रंट सेंटर आर्मरेस्टसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे, टॉप व्हेरिएंटमध्ये सनरूफ आणि व्हेंटिलेटेड सीट्स देण्यात आले आहेत. यामुळे ही कार आपल्या सेगमेंटमध्ये अधिक खास ठरते. 

याशिवाय इतरही अनेक फीचर्स या कारसोबत देण्यात आले आहेत. त्यासंदर्भात बोलायचे झाल्यास...

दमदार फीचर्स -
या कारमध्ये, 10.25-इंच टचस्क्रीन, 360-डिग्री कॅमेरा, ऑटो हेडलॅम्प्स, क्रूझ कंट्रोल, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, वायरलेस चार्जिंग, पुश-बटन स्टार्ट, कीलेस एंट्री, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीसह रिअल-टाइम व्हेइकल ट्रॅकिंग आणि रिमोट कंट्रोल सुविधा देण्यात आली आहे. याशिवया कारला Global NCAP कडून Tata Punch ला 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. आता 6 एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत. ABS आणि EBD, ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स, रियर पार्किंग सेन्सर्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम मजबूत स्ट्रक्चर देण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, हाय-स्ट्रेंथ स्टीलमुळे ही कार आपल्या सेगमेंटमधील सर्वात सुरक्षित SUV मानली जाते.

इंजिन आणि मायलेज  -
- 1.2-लीटर, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन : 87 bhp पॉवर, 115 Nm टॉर्क जनरेट करते.
- CNG वेरियंट : 72 bhp पॉवर, 103 Nm टॉर्क जरनेट करते.
- या कारमध्ये ट्रान्समिशन : मॅन्युअल व ऑटोमॅटिक दोन्ही पर्याय
- पेट्रोल मायलेज : 20.09 kmpl
- CNG मायलेज : 26.99 km/kg

प्रतिस्पर्धक कारही स्वस्त -
- Tata Punch ची टक्कर थेट Hyundai Exter आणि Maruti Suzuki Ignis सोबत आहे.
- GST कपातीनंतर Hyundai Exter मध्ये ₹31,000 ते ₹86,000 इतकी घट.
- Maruti Ignis मध्ये ₹50,000 ते ₹70,000 इतकी घट.

Web Title: After GST reduction, Tata Punch with 5 star rating has become so much cheaper know about the features and details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.