GST कपातीनंतर आता Hyundai Exter देशातील सर्वात स्वस्त सनरूफ SUV, या कारना देते टक्कर; जाणून घ्या खासियत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 12:41 IST2025-10-01T12:40:40+5:302025-10-01T12:41:37+5:30
Hyundai Exter S Smart या किंमतीच्या श्रेणीतील अनेक वाहनांना टक्कर देते. तिची थेट फाइट Tata Punch, Maruti Suzuki Fronx, Maruti Suzuki Ignis, Nissan Magnite, Renault Kiger, Citroen C3 आणि Hyundai Venue (बेस व्हेरिअंट) यांच्याशी आहे.

GST कपातीनंतर आता Hyundai Exter देशातील सर्वात स्वस्त सनरूफ SUV, या कारना देते टक्कर; जाणून घ्या खासियत
GST 2.0 लागू झाल्यानंतर भारतीय ऑटोमोबाइल बाजारात उत्साहाचे वातावरण दिसत आहे. यामुळे Hyundai Exter S Smart ही मायक्रो SUV आता देशातील सर्वात किफायतशीर सनरूफसह असलेली SUV बनली आहे. या कारची नवीन किंमत आता केवळ 7.03 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. Hyundai Exter चे बेस व्हेरिअंट 5.49 लाखांपासून सुरू होते. तर सनरूफसह येणारे S Smart व्हेरिएंट आता आणखी बजट-फ्रेंडली झाले आहे. तर जाणून घेऊयात काससंदर्भात सविस्तर...
असं आहे इंजिन आणि मायलेज -
Hyundai Exter S Smart मध्ये 1.2 लिटर Kappa पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 81.8 बीएचपी पॉवर आणि 113.8 एनएम टॉर्क जनरेट करते. ही कार मॅन्युअल आणि AMT अशा दोन्ही गिअरबॉक्स पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. हिचे पेट्रोल व्हेरिएंट सुमारे 19.4 किलोमीटर तर CNG व्हेरिएंट 27.1 किलोमीटर प्रति किलोग्रॅमपर्यंत मायलेज देते. यामुळे ही कार केवळ किफायतशीरच नव्हे, तर इंधन कार्यक्षमतेच्या दृष्टीनेही उत्कृष्ट आहे.
खास फीचर्स -
Hyundai Exter S Smart आपल्या वैशिष्ट्यांमुळे वेगळी ठरते. यात व्हॉइस-इनेबल्ड स्मार्ट सनरूफ देण्यात आले आहे. जे या किंमतींतील वाहनांमध्ये दुर्मिळ आहे. ड्रायव्हिंग आणि सुरक्षिततेसाठी यात डॅशकॅम (पुढील आणि मागील) देण्यात आला आहे. याशिवाय, 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जे वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay ला सपोर्ट करते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, यात 6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल असिस्ट आणि ISOFIX चाइल्ड सीट अँकर यासारख्या सुविधा आहेत.
या कारशी स्पर्धा -
Hyundai Exter S Smart या किंमतीच्या श्रेणीतील अनेक वाहनांना टक्कर देते. तिची थेट फाइट Tata Punch, Maruti Suzuki Fronx, Maruti Suzuki Ignis, Nissan Magnite, Renault Kiger, Citroen C3 आणि Hyundai Venue (बेस व्हेरिअंट) यांच्याशी आहे. महत्वाचे म्हणजे, सनरूफ आणि प्रगत वैशिष्ट्यांमुळे या कारला व्हॅल्यू-फॉर-मनी SUV असेही म्हटले जात आहे.