Advertorial: बजेटमध्ये फिट, फीचर्समध्ये हिट! विडा VX2 ची दमदार एन्ट्री; ईव्ही स्कूटर मार्केटमध्ये नवी क्रांती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 20:25 IST2026-03-31T20:17:05+5:302026-03-31T20:25:48+5:30
विडा VX2 ची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे याची किंमत. ही स्कूटर १ लाखाच्या आसपास (वाजवी किमतीत) उपलब्ध करून देण्यात आली आहे. या स्कूटरमध्ये सॉफ्टवेअर मोफत देण्यात आले आहे.

Advertorial: बजेटमध्ये फिट, फीचर्समध्ये हिट! विडा VX2 ची दमदार एन्ट्री; ईव्ही स्कूटर मार्केटमध्ये नवी क्रांती
विडाने आपली नवी मोटरसायकल Vida VX2 भारतीय बाजारात आणली आहे. ही स्कूटर प्रामुख्याने मध्यमवर्गीय कुटुंबांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आली आहे. अत्यंत आकर्षक किंमत आणि प्रॅक्टिकल डिझाइन हे या स्कूटरचे मुख्य वैशिष्ट्य आहे. तसेच या स्कूटरची उपयुक्तता आणि लाईफटाईम मोफत असलेले सॉफ्टवेअर हे देखील आकर्षणाचा मुख्य बिंदू आहेत.
विडा VX2 ची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे याची किंमत. ही स्कूटर १ लाखाच्या आसपास (वाजवी किमतीत) उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे ओला S1, बजाज चेतक आणि TVS iQube सारख्या मॉडेल्सपेक्षा ती सरस ठरते. या स्कूटरमध्ये सॉफ्टवेअर मोफत देण्यात आले आहे. इतर कंपन्या त्यासाठी भरमसाठ पैसे घेत आहेत. ही एक 'फॅमिली ओरिएंटेड' स्कूटर आहे. याची सीट मोठी आणि आरामदायी असून पाय ठेवण्यासाठी पुरेशी जागा देण्यात आली आहे. या स्कूटरचा लुकही आधुनिक आहे. तसेच परवडण्यासाठी बॅटरी ॲज ए सर्व्हिस म्हणजेच BaaS योजना देखील देण्यात आली आहे.
या योजनेमुळे तुम्हाला स्कूटर खरेदी करताना बॅटरीचे पूर्ण पैसे द्यावे लागत नाहीत. या योजनेत तुम्हाला दरमहा वापरलेल्या किलोमीटरनुसार शुल्क द्यावे लागेल. हे शुल्क ९० पैसे ते १.४७ रुपये प्रति किमी या दरम्यान असेल. तुम्ही जेवढे जास्त किलोमीटर निवडाल, तेवढा प्रति किमी खर्च कमी होईल. BaaS घेणाऱ्यांना हिरोच्या फास्ट चार्जरवर मोफत चार्जिंग मिळेल आणि बॅटरीची हेल्थ ७०% च्या खाली गेल्यास मोफत रिप्लेसमेंट मिळेल.
बॅटरी आणि रेंज: विडा VX2 मध्ये काढता येण्याजोगी बॅटरी देण्यात आली आहे, जी घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये सहज चार्ज करता येते. एकदा फुल चार्ज केल्यावर ही स्कूटर शहरात वापरण्यासाठी पुरेशी रेंज देते. बजेट सेगमेंटमध्ये असूनही यात 4.3-inch TFT display, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, रिव्हर्स मोड आणि कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत. स्कूटरच्या सीटखाली मोठी जागा दिली आहे, ज्यात हेल्मेट आणि किराणा सामान सहज मावू शकते.
फिचर्स: 4.3-inch TFT display असून यात म्युझिक कंट्रोल, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि फोन कॉल अटेंड करण्याची सुविधा आहे. जिओ-फेन्सिंग, टेलीमेट्री आणि स्क्रीनवर महत्त्वाची कागदपत्रे डिजिटल स्वरूपात साठवण्याची सोय यात देण्यात आली आहे.
परफॉर्मन्स आणि स्पीड: इंजिन क्षमता: यात ६ किलोवॅटची मोटर असून ३.४ किलोवॅटची ड्युअल बॅटरी देण्यात आली आहे. यात तीन रायडिंग मोड्स (Eco, Ride, Sport) दिले आहेत. शहरात फिरण्यासाठी याची 'ईको' मोडमधील रेंज 100 किमीपर्यंत मिळते. कंपनीने आयडीसी रेंज १४२ किमी एवढी दिलेली आहे. ही स्कूटर अवघ्या ३.२ सेकंदात ० ते ४० किमीचा वेग पकडते. याचा टॉप स्पीड ८० किमी/तास इतका आहे.
बूस्ट फंक्शन:विडा VX2 या स्कूटरचे सर्वात खास फीचर आहे. तुम्ही कोणत्याही मोडमध्ये (Eco, Ride किंवा Sport) असलात, तरी ओव्हरटेक करण्यासाठी हे बटण दाबताच तुम्हाला स्कूटरची पूर्ण शक्ती वापरता येते.
प्रॅक्टिकलिटी: ड्युअल बॅटरी असलेल्या 'Plus' व्हेरियंटमध्ये २७ लिटर, तर सिंगल बॅटरी असलेल्या 'Go' व्हेरियंटमध्ये ३३ लिटर मोठी जागा मिळते. समोरच्या बाजूला ५ लिटरचे छोटे कप्पे दिले आहेत, ज्यात मोबाईल, पाण्याची बाटली किंवा वॉलेट सहज ठेवता येईल. १२ इंचाची चाके आणि टेलिस्कोपिक फोर्क सस्पेन्शनमुळे ही स्कूटर खराब रस्त्यावरही आरामदायी वाटते. पिकअप छान असल्याने ट्रॅफिकमधून ही स्कूटर चालवणे अत्यंत सोपे आहे.
चार्जिंगचे ३ जबरदस्त पर्याय: हिरोच्या ५३०० चार्जिंग स्टेशनवर किंवा एथरच्या ग्रिडवर तुम्ही ही स्कूटर वेगाने चार्ज करू शकता. शिवाय तुमच्या पार्किंगमध्ये उपलब्ध असलेल्या सॉकेटला पोर्टेबल चार्जर जोडून स्कूटर चार्ज करता येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुम्ही दोन्ही बॅटरी काढून तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये कोणत्याही ५A च्या साध्या सॉकेटवर चार्ज करू शकता. ज्यांच्या पार्किंगमध्ये चार्जिंग सोय नाही, त्यांच्यासाठी हे वरदान आहे.
जर तुम्हाला शहरात फिरण्यासाठी एक स्वस्त, टिकाऊ आणि कमी देखभालीची इलेक्ट्रिक स्कूटर हवी असेल, तर विडा VX2 हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. विशेषतः हिरोच्या मोठ्या सर्व्हिस नेटवर्कचा फायदा ग्राहकांना मिळणार आहे.