Honda vs Suzuki: होन्डा अॅक्टिव्हा आणि सुझुकी अॅक्सेसमध्ये चुरस; कोण आहे 'स्मार्ट फीचर्स'चा खरा किंग? वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 16:58 IST2025-10-24T16:55:53+5:302025-10-24T16:58:42+5:30
Best 125cc scooter in India: भारतीय १२५ सीसी स्कूटर सेगमेंटमध्ये होंडा अॅक्टिव्हा आणि सुझुकी अॅक्सेस या दोन स्कूटर्समध्ये जोरदार चुरस आहे

Honda vs Suzuki: होन्डा अॅक्टिव्हा आणि सुझुकी अॅक्सेसमध्ये चुरस; कोण आहे 'स्मार्ट फीचर्स'चा खरा किंग? वाचा
भारतीय १२५ सीसी स्कूटर सेगमेंटमध्ये होंडा अॅक्टिव्हा आणि सुझुकी अॅक्सेस १२५ या दोन स्कूटर्समध्ये जोरदार चुरस आहे. दोन्ही मॉडेल्स विश्वासार्हता आणि कार्यक्षमतेसाठी ओळखली जातात. परंतु, आधुनिक फीचर्स आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत कोणती स्कूटर अधिक 'स्मार्ट' आहे, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि टेक्नोलॉजी
| फीचर्स | होंडा अॅक्टिव्हा १२५ | सुझुकी अॅक्सेस १२५ |
| डिस्प्ले | ४.२-इंच टीएफटी डिस्प्ले | ४.२-इंच टीएफटी डिस्प्ले |
| ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी | उपलब्ध (कॉल/एसएमएस अलर्ट, नेव्हिगेशन) | उपलब्ध (कॉल/एसएमएस अलर्ट, नेव्हिगेशन) |
| अतिरिक्त डिस्प्ले वैशिष्ट्य | टॅकोमीटर | टॅकोमीटर नाही |
| कंट्रोलर | ५-वे जॉयस्टिक कंट्रोलर | साधे नियंत्रण |
| निष्कर्ष | Activa 125 डिस्प्ले तंत्रज्ञानात थोडी पुढे आहे. | Access 125 विभागात आपले स्थान टिकवून आहे. |
हाय-टेक फीचर्स
होंडा अॅक्टिव्हा १२५ (एच- स्मार्ट व्हेरियंट): अॅक्टिव्हा १२५ एच- स्मार्ट व्हेरियंट कीलेस ऑपरेशन सिस्टीमसह येतो. या स्मार्ट की फोबमुळे चावीशिवाय स्कूटर सुरू करता येते. यात स्कूटर शोधण्यासाठी लोकेट माय स्कूटर फीचर्स देखील देण्यात आले आहे.
सुझुकी अॅक्सेस १२५: अॅक्सेस १२५ मध्ये असे हाय-टेक 'कीलेस' फीचर्स उपलब्ध नाहीत. ही स्कूटर उच्च तंत्रज्ञानापेक्षा साध्या, वापरण्यास सोप्या आणि देखभालीसाठी स्वस्त डिझाइनवर अधिक लक्ष केंद्रित करते, ज्यामुळे ती सर्व वयोगटातील रायडर्ससाठी सोयीस्कर ठरते.
| फीचर्स | होंडा अॅक्टिव्हा १२५ | सुझुकी अॅक्सेस १२५ |
| इंधन कार्यक्षमता | आयडल स्टॉप-स्टार्ट सिस्टीम | स्टॉप-स्टार्ट सिस्टीम उपलब्ध नाही |
| फ्रंट स्टोरेज | कमी/नाही (मुख्यतः ॲक्सेसरीजवर अवलंबून) | दोन फ्रंट स्टोरेज पॉकेट्स (मोबाईल, वॉलेटसाठी) |
| सीटखालील स्टोरेज | अंदाजे १८ लिटर | २४.४ लिटर (Activa 125 पेक्षा ६.४ लिटर जास्त) |
| निष्कर्ष | Activa 125 इंधन बचतीसाठी चांगली. | Access 125 स्टोरेज आणि व्यावहारिक डिझाइनमध्ये सरस. |
तज्ज्ञांचे मत
होंडा अॅक्टिव्हा १२५: तंत्रज्ञान आणि आधुनिक फीचर्सच्या निकषावर पाहिले तर, होंडा अॅक्टिव्हा १२५ थोडी आघाडीवर आहे. विशेषत: तिचा आरपीएम गेज, ५-वे जॉयस्टिक आणि एच- स्मार्ट व्हेरियंटमधील कीलेस ऑपरेशन तिला अधिक हाय-टेक बनवतात.
सुझुकी अॅक्सेस १२५: सुझुकी अॅक्सेस १२५ ही दैनंदिन वापरासाठी अधिक व्यावहारिक आहे. उत्तम स्टोरेज क्षमता (२४.४ लिटर) आणि साधा लूक या स्कूटरला सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठी उत्कृष्ट पर्याय बनवते.