लॅपटॉप बनवणाऱ्या कंपनीने आणली इलेक्ट्रिक स्कूटर, 100 किलोमीटरची रेंज देणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 12:22 PM2023-09-15T12:22:47+5:302023-09-15T12:23:33+5:30

ही स्कूटर बाजारात कधी आणली जाईल आणि या स्कूटरमध्ये काय फीचर्स आहेत, याबद्दल जाणून घ्या...

acer electric scooter muvi 125 4g unveiled offers upto 100km driving range | लॅपटॉप बनवणाऱ्या कंपनीने आणली इलेक्ट्रिक स्कूटर, 100 किलोमीटरची रेंज देणार!

लॅपटॉप बनवणाऱ्या कंपनीने आणली इलेक्ट्रिक स्कूटर, 100 किलोमीटरची रेंज देणार!

googlenewsNext

नवी दिल्ली : लॅपटॉप तयार करणारी कंपनी एसरने (Acer) देखील इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये उडी घेतली आहे. कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आणली आहे. ग्रेटर नोएडा येथे आयोजित EV India Expo 2023 दरम्यान कंपनीने MUVI 125 4G इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. दरम्यान, ही स्कूटर बाजारात कधी आणली जाईल आणि या स्कूटरमध्ये काय फीचर्स आहेत, याबद्दल जाणून घ्या...

Acer ने ही इलेक्ट्रिक स्कूटर eBikeGo (इलेक्ट्रिक वाहन निर्माता) च्या सहकार्याने विकसित केली आहे, कंपनीने Acer MUVI 125 4G स्कूटर दोन स्वॅप करण्यायोग्य बॅटरीसह लॉन्च केली आहे. तसेच, Acer MUVI 125 4G च्या ड्रायव्हिंग रेंजबद्दल सांगायचे तर, ही स्कूटर इको मोडमध्ये पूर्ण चार्ज केल्यानंतर 100 किलोमीटरपर्यंत धावू शकते. एवढेच नाही तर या स्कूटरचा टॉप स्पीड 60km/h असणार आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3kW ची इलेक्ट्रिक मोटर दिली आहे, याशिवाय, इंप्रुव्ह्ड स्टेबलिटी आणि हँडलिंगसाठी 16 इंच असलेले व्हील्स दिले आहेत.

Acer ची ही पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्यात आली आहे, पण आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की ही स्कूटर भारतीय मार्केटमध्ये कधी आणली झाणार? तर तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की ही इलेक्ट्रिक स्कूटर नोव्हेंबरमध्ये दिवाळीपर्यंत मार्केटमध्ये आणली जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, या स्कूटरच्या किंमतीबाबत कंपनीने अद्याप कोणतेही संकेत दिलेले नाहीत. म्हणजेच किंमत जाणून घेण्यासाठी तुम्हाला मार्केट लाँचिंग इव्हेंटची प्रतीक्षा करावी लागेल. दरम्यान, Acer कंपनीची ही पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आहे, यानंतर आणखी नवीन स्कूटर लाँच केल्या जाऊ शकतात.

Web Title: acer electric scooter muvi 125 4g unveiled offers upto 100km driving range

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.