नव्या Maruti Alto K10 वर बम्पर डिस्काउंट, पण या महिन्यात खरेदी केली तरच मिळेल सूट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 10:30 IST2022-12-05T10:28:18+5:302022-12-05T10:30:56+5:30
आता वर्षाच्या अखेरीस कंपनीकडून नवी मारुती ऑल्टो के10 वर 50,000 रुपयांपर्यंतची डिस्काउंट ऑफर दिली जात आहे.

नव्या Maruti Alto K10 वर बम्पर डिस्काउंट, पण या महिन्यात खरेदी केली तरच मिळेल सूट!
मारुती सुझुकीने ऑगस्त 2022 मध्ये देशातील तिसऱ्या पिढीची ऑल्टो के-10 बाजारात आणली आहे. ही एंट्री-लेव्हल हॅचबॅकला STD, LXi, VXi आणि VXi+ या चार ट्रिम्समध्ये आणली आहे. हिचे एकूण 6 व्हेरिअंट आहेत. या कारची किंमत 3.99 लाख रुपयांपासून सुरू होऊन 5.84 लाख रुपयांपर्यंत जाते (एक्स-शोरूम). आता वर्षाच्या अखेरीस कंपनीकडून नवी मारुती ऑल्टो के10 वर 50,000 रुपयांपर्यंतची डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. ग्राहक हिच्या मॅनुअल व्हेरिअंटवर 50,000 रुपयांपर्यंतचा फायदा मिळवू शकतात. यात रोख सूट, एक्सचेन्ज बोनस आणि कॉर्पोरेट लाभाचा समावेश आहे.
ऑल्टो के-10 एलएक्सआय (एमटी), वीएक्सआय (एमटी) आणि व्हीएक्सआय+ एमटीवर अनुक्रमे, 30,000 रुपये, 25,000 रुपये आणि 15,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट मिळेल. या कारवर 15,000 रुपयांचा एक्सचेन्ज बोनस आणि 5,000 रुपयांची कॉर्पोरेट ऑफरही मिळेल. एएमटी व्हेरिअंटवर केवळ 15,000 रुपयांचा एक्सचेन्ज बोनस आणि 5,000 रुपयांचा कॉर्पोरेट लाभ मिळत आहे. ऑल्टो के10 एएमटी व्हेरिअंट्सवर कुठल्याही प्रकारची सूट नाही.
याशिवाय, मारुती ऑल्टो 800 वरही ऑफर्स आहेत. या कारवर 34,000 रुपयांचे बेनिफिट्स ऑफर करण्यात येत आहेत. यात, 15,000 रुपयांची रोख सूट 15,000 रुपयांचा एक्सचेन्ज बोनस आणि 4,000 रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे.
हार्टटेक प्लॅटफॉर्मवर बेस्ड नव्या मारुती ऑल्टो के-10 मध्ये 1.0 लीटर, 3-सिलेंडर के10सी पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 5-स्पीड मॅनुअल आणि 5-स्पीड AMT गिअरबॉक्स (ऑप्शनल) सह ऑफर केले जाते. हे इंजिन 67bhp पॉवर आणि 89Nm टार्क जनरेट करते. यात डुअलजेट तंत्रज्ञान आणि आयडल स्टार्ट/स्टॉप सिस्टिम मिळते. या शिवाय, कारमध्ये ऑल्टो800 पेक्षा अधिक फीचर्स आहेत. या कारमध्ये स्टिअरिंग माउंटेड कंट्रोल्सदेखील देण्यात आले आहे.