शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

एका चार्जमध्ये 480 किमी रेंज; Hyundai Ioniq 5 लाँच, जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 2:55 PM

Hyundai Ioniq 5 : ह्युंदाईच्या Ioniq 5 कारने कोना ईव्हीला मागे टाकले आहे. कोना इलेक्ट्रीक या आधी सर्वाधिक रेंज देणारी कार होती.

दक्षिण कोरियाची अग्रेसर वाहन निर्माता कंपनी ह्युंदाई मोटर्सने मंगळवारी Ioniq 5 मिड-साइज क्रॉसओवर लाँच केली आहे. ही कार पेट्रोल, डिझेलवर चालणारी नसून ती विजेवर चालणारी आहे.  कंपनीलाही या कारपासून मोठी अपेक्षा आहे. या कारमुळे कंपनी 2025 पर्यंत EV कंपन्यांच्या यादीत जगातील तिसऱ्या क्रमांकावर जाण्याची शक्यता आहे. (Hyundai IONIQ 5 Electric Car Debuts With 470 Kms Range)

Hyundai Motor ने सांगितले की, Ioniq 5 ला कंपनीने नवीन इलेक्ट्रिक वाहनांच्या प्लॅटफ़ॉर्मवर तयार केले आहे. हा प्लॅटफॉर्म स्वत:च्याच बॅटरी मॉड्यूल तंत्रज्ञानाचा वापर करतो, तसेच सध्याच्या कंपनीच्या अन्य ईव्ही कारपेक्षा कमी सुटे भाग वापरता येतात. यामुळे कमी उत्पादन खर्च आणि वेगाने उत्पादन करता येणार आहे. Ioniq 5 च्या लाँचिंगनंतर Hyundai ला जागतिक ईव्ही बाजारात 10 टक्के हिस्सेदारी मिळवायचे आहे. 2020 मध्ये ह्युंदाई आणि कियासाठी हा आकडा 7.2% टक्के आहे. 2020 मध्ये या दोन्ही कंपन्यांनी मिळून 1 दशलक्ष ईलेक्ट्रीक वाहनांची विक्री केली आहे. 

एकदा चार्ज केली की ह्युदाईची आयोनिक 5 ही कार 480 kms चे अंतर तोडते. जे ह्युंदाईच्याच कोना ईव्हीपेक्षा 20 टक्के जास्त आहे. कोना इलेक्ट्रीक या आधी सर्वाधिक रेंज देणारी कार होती. Ioniq 5 ही कार सध्या दोन बॅटरी पर्यायात मिळणार आहे. 58-(kWh) आणि 72.6 kWh असे हे दोन पर्याय आहेत. 2021 च्या पहिल्या सहामाहीत ही कार रस्त्यावर दिसू लागणार असून काही निवडक विभागांत ही कार विकली जाणार आहे. 

सध्यातरी भारतात ईव्हीने जोर पकडलेला नसल्याने ती युरोपमध्ये विकली जाणार आहे. तसेच या कारची किंमत युरोपमधील सरकारी प्रोत्साहन वगळून 51,100 डॉलरपासून सुरु होणार असल्याचे संकेत ह्युंदाई मोटर यूरोपचे अध्यक्ष मायकल कोल यांनी दिले आहेत. ह्युंदाईचा लक्झरियस ब्रँड Genesis च्या कारमधील स्टीअरिंग व्हील व अन्य इंटेरिअर वापरण्यात आले आहे. 

Hyundai धमाका करणार; नव्या सात सीटर एसयुव्ही Alcazar ची घोषणा

दक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी ह्युंदाईच्या सर्वाधिक खपाच्या क्रेटा एसयुव्हीचे 7 सीटर व्हर्जन येणार असल्याची गेल्य़ा काही काळापासून चर्चा सुरु होती. याच्या मॉडेलच्या नावावरून देखील चर्चा होत होती. आता कंपनीने हे नाव जाहीर केले आहे. Hyundai Alcazar असे नाव देण्यात आले असून लवकरच ही सात सीटर एसयुव्ही लाँच केली जाणार आहे. 

टॅग्स :Hyundaiह्युंदाईElectric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleवीजेवर चालणारं वाहन