२३ लाखांची बाइक येतेय; अशी आहेत वैशिष्ट्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 12:59 PM2022-11-24T12:59:30+5:302022-11-24T13:00:46+5:30

नवी दिल्ली : जगप्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी ‘ बीएमडब्ल्यू’ने भारतात तब्बल १ हजार सीसी क्षमतेची नवी स्पोर्टस् बाइक आणण्याची ...

23 lakh bike is coming; Such are the Features | २३ लाखांची बाइक येतेय; अशी आहेत वैशिष्ट्ये

२३ लाखांची बाइक येतेय; अशी आहेत वैशिष्ट्ये

googlenewsNext

नवी दिल्ली : जगप्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी ‘बीएमडब्ल्यू’ने भारतात तब्बल १ हजार सीसी क्षमतेची नवी स्पोर्टस् बाइक आणण्याची तयारी केली आहे. ‘बीएमडब्ल्यू एस १००० आरआर’ या नावाची ही बाइक येत्या १० डिसेंबर रोजी भारतीय बाजारात उतरविली जाणार आहे. तीची किंमत १९ ते २३ लाखांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये या बाइकचा ग्लोबल डेब्यू आला होता.

बाइकची वैशिष्ट्ये
- बाइकमध्ये ९९९ सीसीचे लिक्विड कूल्ड,  ४-सिलिंडरयुक्त इंजिन असेल.
- २०६.५ बीएचपी कमाल पॉवर आणि ११३ एनएम टॉर्क
- जुन्या मॉडेलपेक्षा ३ बीएचपींनी ताकद वाढली आहे. 
- इंजिन १४,६०० आरपीएम, ६ स्पीड गीअरबॉक्स. १,४५७ मिमी व्हील बेस 
- ॲडजस्ट फंक्शनमुळे छोट्या स्वारांसाठी बाइकची उंची कमी होईल
 

Web Title: 23 lakh bike is coming; Such are the Features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.