शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

Royal Enfield Classic 350: अॅडव्हान्स्ड फीचर्ससह लाँच झाली Classic 350; पाहा किंमत आणि फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 14:49 IST

Royal Enfield नं बुधवारी लाँच केली बहुप्रतीक्षीत Royal Enfield Classic 350. जबरदस्त लूक आणि इंजिन क्षमतेसह कंपनीनं आणली नेक्स्ट जनरेशन बाईक.

ठळक मुद्देRoyal Enfield नं बुधवारी लाँच केली बहुप्रतीक्षीत Royal Enfield Classic 350. जबरदस्त लूक आणि इंजिन क्षमतेसह कंपनीनं आणली नेक्स्ट जनरेशन बाईक.

Royal Enfield नं दीर्घ प्रतीक्षेनंतर मोटारसायकल रायडर्सना एक नवीन भेट दिली आहे. कंपनीनं बुधवारी आपल्या बेस्ट सेलिंग बाईक Classic 350 चं नेक्स्ट जनरेशन मॉडेल लाँच केलं. अतिशय आकर्षक लूक आणि मजबूत इंजिन पॉवर असलेली ही बाईक एकूण 5 ट्रिम आणि 11 आकर्षक रंगांमध्ये बाजारात आणण्यात आली आहे. 

कंपनीनं व्हर्च्युअल इव्हेंट दरम्यान या बेस्ट सेलिंग बाईकचं नेक्स्ट जनरेशन मॉडेल लाँच केलं. नवीन Classic 350 रेडडिच, हेलकॉन, सिग्नल, डार्क आणि क्रोमसह एकूण पाच ट्रिममध्ये ऑफर करण्यात आली आहे. ज्या ग्राहकांना ही बाईक बुक करायची असेल त्यांना ती कंपनीच्या डीलरशीपमधून किंवा ऑनलाइन वेबसाईटवरून बुक करता येणार आहे. या बाईकसह कंपनी तीन वर्षांची स्टँडर्ड वॉरंटी आणि १ वर्षांचा रोड साईड असिस्टंटही देत आहे.

जबरदस्त इंजिननवी Classic 350 ही कंपनीच्या J मॉड्युलर आर्किटेक्चरवर बेस्ड आहे. यावर कंपनीनं नुकतीच सादर केलेली मेट्योर 350 देखील तयार केली आहे. Classic 350 मध्ये कंपनीनं 349cc क्षमतेच्या नव्या फ्युअल इंजेक्टेट इंजिनचा वापर केला आहे. हे इंजिन 20.2bhp ची पॉवर आणि 27Nm चा टॉर्क जनरेच करतं. हे इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्ससह येतं. तसंच ही बाईक सिंगल आणि ड्युअल सीट व्हेरिअंटमध्ये येते.

कोणते आहेत फीचर्स?कंपनीनं या बाईकच्या लूकमध्येच नाहीतर याच्या मेकॅनिज्म आणि तंत्रज्ञानातही बदल केला आहे. ही बाईक यापूर्वीच्या मॉडेलपेक्षा अधिक चांगली बनते. नव्या क्लासिक 350 मध्ये कंपनीनं पायलेट लॅपसह नवे हेडलँप, अपडेटेड फ्युअल टँक ग्राफिक्स, नव्या डिझाईनचा एक्झॉस्ट आणि टेल लाईट दिले आहेत.

याशिवाय कंपनीनं या बाईकमध्ये आरामदायक सीटही दिली आहे, जी रायडरसह पिलन रायडरलाही कम्फर्ट देतो. या बाईकचा हेडलँप यापूर्वीच्या बाईकप्रमाणेच आहे. परंतु ग्रिप्स, स्विच क्युब्स, इन्फो स्विच आणि ओवल मास्ट सिलिंडरमध्ये मॉडिफिकेशनसह अॅर्गोनॉमिक्समध्ये सुधारणा करण्यात आली आहे. अन्य खास फीचर बाबत सांगायचं झालं तर यात इंटिग्रेटेड इग्निशन, स्टेअरिंग लॉक, एलसीडी इन्फो पॅनलसोबत सेमी डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर आणि युएसबी चार्जर दिला आहे.

या बाईकच्या सुरूवातीच्या मॉडेलची किंमत 1,84,374 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी निश्चित करण्यात आली आहे. आणखी फीचर्सबद्दल सांगायचं झालं तर यात ब्लूटूथ बेस्ड ट्रिपर नेव्हिगेशनही देण्यात आलं आहे, जे डेडिकेटेड TFT डिस्प्ले डिव्हाईससोबत येतं. यामध्ये ग्राहकांना गुगल नेव्हिगेशनही मिळतं, जे यापूर्वी Mateor 350 मध्ये पाहण्यास मिळालं होतं.

टॅग्स :Royal Enfieldरॉयल एनफिल्डbikeबाईकIndiaभारतonlineऑनलाइन