अमेय गोगटे हे Lokmat.com चे संपादक आहेत. गेली २१ वर्षं ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात १७ वर्षं काम करत आहेत. त्याआधी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातही त्यांनी काम केलं आहे. राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. त्याशिवाय, 'डोक्याला थॉट' या पॉडकास्टमध्ये ते विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या मुलाखती घेतात. गरवारे इन्स्टिट्युटमधून त्यांनी जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. तसंच, काही बीएमएम कोर्सेसमध्ये ते लेक्चरर म्हणून जातात. 'लोकमत'आधी त्यांनी तरुण भारत, झी २४ तास, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.Read more