अमेय गोगटे हे Lokmat.com चे संपादक आहेत. गेली २१ वर्षं ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात १७ वर्षं काम करत आहेत. त्याआधी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातही त्यांनी काम केलं आहे. राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. त्याशिवाय, 'डोक्याला थॉट' या पॉडकास्टमध्ये ते विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या मुलाखती घेतात. गरवारे इन्स्टिट्युटमधून त्यांनी जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. तसंच, काही बीएमएम कोर्सेसमध्ये ते लेक्चरर म्हणून जातात. 'लोकमत'आधी त्यांनी तरुण भारत, झी २४ तास, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.Read more
एखाद्या व्यक्तीला, विचारधारेला ट्रोल करणं हा हल्ली दैनंदिन कार्यक्रमच झाला आहे. त्याचं समर्थन अजिबातच करता येणार नाही. पण, तुम्ही जे केलंत, ते चुकलंच. कारण.... ...
Maharashtra Election 2019: सत्तेशिवाय कामं करता येणार नाहीत, हे उद्धव ठाकरेंचं लॉजिक आहे आणि ते चुकीचंही नाही. फक्त मुद्दा आहे, तो त्यांनी भाजपासोबत केलेल्या 'तडजोडी'चा. तीच शिवसैनिकांना खटकली आहे. ...
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हा खर्जातला आवाज ऐकून अख्खं शिवाजी पार्क उसळायचं. कारण, त्या आवाजात जरब होती, दम होता, वेगळीच जादू होती. ...
‘मी एकच सांगेन, ध्येय निश्चित असेल, मेहनतीची तयारी असेल तर कुणालाही घाबरू नका आणि सगळ्यांना सोबत घेऊनच पुढे जाता येतं, हे लक्षात ठेवा! मग यश दूर नाही.’ बालाजी वेफर्सचे संचालक चंदूभाई विरानी यांचा तरुणांना यशाचा मंत्र ...