youngster killed in Aurangabad's Kailas nagar by inviting him to drink tea | चहा पिण्यास बोलावून धारदार शस्त्राने वार करत तरुणाची हत्या

चहा पिण्यास बोलावून धारदार शस्त्राने वार करत तरुणाची हत्या

ठळक मुद्देधारदार शस्त्राने वार केल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

औरंगाबाद : आर्थिक व्यवहाराच्या वादातून एका तरुणाची कैलास नगर येथे धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या केल्याची घटना सोमवारी (दि. १९) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. फेरोज अनिस खान (३२ , रा. दागा कॉलनी) असे मृत तरुणाचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, फेरोज खान याचा रविवारी रात्री कैलास नगर येथे राहणाऱ्या हुसेन बाली याच्यासोबत वाद झाला. हुंसेन बाली हा याच परिसरात जुगार अड्डे चालवतो. आज सकाळी हुसेन बाली याने फेरोज खानला, रात्री झालेला वाद सोडून चहा पिण्यास ये असे म्हणत कैलास नगर येथे बोलवून घेतले. कैलास नगर येथे येताच हुसेन आणि त्याच्या साथीदारांनी फेरोजवर हल्ला केला. मारहाण करत  धारदार शस्त्राने भोसकून तेथून पलायन केले. यात गंभीर जखमी झालेल्या फेरोजचा जागीच मृत्यू झाला. 

दरम्यान, पोलिसांनी मुख्य आरोपी हुसेन बाली यास अटक केल्याची माहिती आहे.  

Web Title: youngster killed in Aurangabad's Kailas nagar by inviting him to drink tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.