पार्सल बॉयच्या वेशात आलेल्या चोरट्यांनी १५ मिनिटांत पळवले १८ लाखांचे सुवर्णलंकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 04:58 PM2020-10-30T16:58:27+5:302020-10-30T17:04:50+5:30

'पार्सल बॉय' म्हणून आले अन मुलीच्या लग्नासाठी जमविलेले १८ लाखांचे दागिने पळविले

They came as a 'parcel boy' and snatched jewelery worth Rs 18 lakh collected for his daughter's wedding | पार्सल बॉयच्या वेशात आलेल्या चोरट्यांनी १५ मिनिटांत पळवले १८ लाखांचे सुवर्णलंकार

पार्सल बॉयच्या वेशात आलेल्या चोरट्यांनी १५ मिनिटांत पळवले १८ लाखांचे सुवर्णलंकार

googlenewsNext
ठळक मुद्देमाजी सैनिकाचे घर फोडलेपडेगावात भरदिवसा घरफोडी

औरंगाबाद : पडेगाव, गुलमोहर कॉलनीतील माजी सैनिकाचे घर गुरुवारी भरदुपारी फोडून चोरट्यांनी १७ लाख ५० हजार रुपये किमतीचे  ३५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि दोन हजारांची रोकड पळविली.  

सूर्यकांत शेकू जाधव (५७, रा. प्लॉट क्र. १११) यांनी सकाळी ११:3० वाजेच्या सुमारास पत्नी आणि मुलीला रेल्वेस्टेशन परिसरात एका विवाहस्थळी सोडले. तेथून  ते माजी सैनिक कल्याण कार्यालयात कामावर गेले. दुपारी १:3० ते १:४५  वाजता कुरिअरच्या पार्सलची बॅग आणि तोंडाला मास्क लावलेले  दुचाकीस्वार दोन संशयित तरुण गुलमोहर कॉलनीत आले. ते  जाधव यांच्या घरापासून अंदाजे २० फूट अंतरावर उभे राहिले. शेजारील सैनिकाने त्यांना पाहिले आणि कोणाकडे आलात  असे विचारले. त्यांच्यापैकी एकाने साहेबांकडे आलो आहे, त्यांना कुरिअरचे पार्सल द्यायचे असल्याचे सांगितले. जाधव कुटुंब घरी नसल्याचे त्या जवानाला माहिती नव्हते, यामुळे त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. 

यानंतर एक जण जाधव यांच्या बंगल्यात घुसला. तर दुसरा बाहेर थांबला.  काही मिनिटांत चोराने  मुख्य दाराचा  कडीकोंडा तोडून आत घुसला. तो बेडरूममध्ये गेला आणि लोखंडी कपाटातील ३५ तोळे सोन्याचे दागिने आणि दोन हजारांची रोकड घेऊन दोघांनी पोबारा केला. सायंकाळी ४:3० वाजेच्या सुमारास जाधव यांची पत्नी घरी आली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी रडतच ही माहिती जाधव यांना कळविली.  जाधव घरी येईपर्यंत शेजाऱ्यांनी छावणी पोलिसांना कळविले. गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक शेख, हवालदार प्रकाश चव्हाण, राजू सोळुंके, नितीन देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथक आणि  ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

दुसऱ्या मुलीचेही दागिने त्यातच ठेवलेले
जाधव यांची विवाहित मुलगी आणि जावई रेल्वेस्टेशन परिसरात राहतात. चोऱ्या होतात म्हणून थोरल्या मुलीने त्यांचे दागिने माहेरी आणून ठेवले होते. धाकट्या मुलीच्या लग्नासाठी खरेदी केलेले सोन्याचे दागिने, पत्नीचे दागिने एकत्र  लोखंडी कपाटात ठेवले होते.

चोरी गेलेला ऐवज
बांगड्या - साडेपाच तोळे, पोत ४ तोळे, अंगठी ९ ग्रॅम, ४ अंगठ्या २ तोळे, शुद्ध सोन्याचा अंगठीचा पिळा १५ ग्रॅम, गंठण साडेतीन तोळे, मिनी गंठण साडेचार तोळे, नेकलेस ३ ग्रॅम, ४ नग वाकडी नथ साडेचार तोळे, २ नग सोनसाखळी  २० ग्रॅम, लॉकेट २५ ग्रॅम, पुतळी २ नग ६ ग्रॅम.
 

Web Title: They came as a 'parcel boy' and snatched jewelery worth Rs 18 lakh collected for his daughter's wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.