साहित्य परिषदेचा वर्धापन दिन साधेपणाने साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 12:32 PM2020-09-30T12:32:28+5:302020-09-30T12:33:31+5:30

व्याख्यानमाला, साहित्यिकांचा सत्कार अशा थाटात दरवर्षी उत्साहात साजरा होणारा मराठवाडा साहित्य परिषदेचा वर्धापन दिन यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अगदी साधेपणाने आणि मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत साजरा झाला. मंगळवार दि. २९ रोजी  साहित्य परिषदेच्या सभागृहात  या कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले होते.

Simply celebrate the anniversary of Sahitya Parishad | साहित्य परिषदेचा वर्धापन दिन साधेपणाने साजरा

साहित्य परिषदेचा वर्धापन दिन साधेपणाने साजरा

googlenewsNext

औरंगाबाद : व्याख्यानमाला, साहित्यिकांचा सत्कार अशा थाटात दरवर्षी उत्साहात साजरा होणारा मराठवाडासाहित्य परिषदेचा वर्धापन दिन यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अगदी साधेपणाने आणि मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत साजरा झाला.

मंगळवार दि. २९ रोजी साहित्य परिषदेच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठवाडा साहित्य परिषदेचे तीन संस्थापक प्रा. भगवंत देशमुख, डॉ. ना. गो. नांदापूरकर, न. शे. पोहनेरकर आणि परिषदेचे एक अध्यक्ष प्रा. नरहर कुरूंदकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वर्धापन दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. 

परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक राजेंद्र निधोनकर, मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे यांची यावेळी उपस्थिती होती. सनी जाधव, विशाल काथार, विकास वानखेडे यांचेही या छोटेखानी कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले. 

Web Title: Simply celebrate the anniversary of Sahitya Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.