धक्कादायक ! लग्नापूर्वीच तरूणी गर्भवती; उघडकीस येताच परस्पर केला गर्भपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2021 04:50 PM2021-10-20T16:50:33+5:302021-10-20T16:51:16+5:30

न्यायालयातून आणलेल्या आदेशाच्या आधारे हा गुन्हा दाखल

Shocking! Young woman pregnant before marriage; Mutual abortion as soon as it is revealed | धक्कादायक ! लग्नापूर्वीच तरूणी गर्भवती; उघडकीस येताच परस्पर केला गर्भपात

धक्कादायक ! लग्नापूर्वीच तरूणी गर्भवती; उघडकीस येताच परस्पर केला गर्भपात

Next

औरंगाबाद : तरूणी गर्भवती असल्याची माहिती लपवून तरूणासोबत तिचे लग्न लावून फसवणूक ( Young woman pregnant before marriage) केल्याच्या आरोपावरून पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात तरूणीसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार २५ जानेवारी २०२१ ते ४ मे दरम्यान शिवाजीनगर येथे घडला.

देवआनंद अनिल कपूर, अभिजीत देवानंद सहारे आणि दोन महिलांचा आरोपीमध्ये समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की चेतन वाघारे यांनी न्यायालयातून आणलेल्या आदेशाच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी तरूणी लग्नापूर्वीच गर्भवती होती. ही बाब लपवून त्यांनी तरूणासोबत तिचा विवाह लावला. ही बाब समोर आल्यावर तरूणाने याविषयी जाब विचारल्यानंतरच त्यांनी तिचा परस्पर गर्भपात करून पुरावा नष्ट केला. या तक्रारीच्या आधारे दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मीरा चव्हाण या करीत आहेत.

लग्नासाठी धमकी देणाऱ्याला पोलीस कोठडी
औरंगाबाद : लग्नास नकार दिल्याने युवतीचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल करून ‘लग्न केेले नाही, तर फाशी घेऊन तुझे व तुझ्या आई-वडिलांचे नाव घेईन’ अशी धमकी देणारा रवींद्रसिंग ऊर्फ राजा गणेशसिंग रेतीवाले (२७, रा. रहिपुरा, कागजीपुडा, हैदराबाद तेलंगणा) याला २० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.डी. सुंगारे-तांबडे यांनी मंगळवारी दिले. सहायक सरकारी वकील ए.व्ही. घुगे यांनी सरकारतर्फे काम पाहिले.

Web Title: Shocking! Young woman pregnant before marriage; Mutual abortion as soon as it is revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app