Shivaji Nagar subway remains sharp | शिवाजी नगर भुयारी मार्गाचा तिढा कायम

शिवाजी नगर भुयारी मार्गाचा तिढा कायम

औरंगाबाद : शिवाजीनगर येथील भुयारी मार्ग अद्यापही प्रस्तावातच आहे. भुयारी मार्गाच्या कामासाठी रेल्वेबरोबर राज्य शासनानेही निधीचा वाटा उचलावा. यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर  हा प्रस्ताव  रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती  गुरूवारी दक्षिण  मध्य रेल्वे  आयोजित पत्रकार  परिषदेत देण्यात आली. 

भुयारी मार्गाच्या कामासाठी रेल्वे खर्च करण्यास तयार आहे. परंतु त्यासोबतच राज्य शासनानेही खर्च वाटून घेण्यास मान्यता देणे गरजेचे आहे. त्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य सचिवांना प्रस्ताव पाठविला आहे. त्यांच्याकडून कॉस्ट शेअरिंगबाबत मान्यता मिळाल्यानंतरच हा प्रस्ताव मंजुरीसाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचे दक्षिण मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.

शिवाजी नगर येथील भुयारी मार्गाचा तिढा सुटत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.त्यामुळे हा मार्ग लवकरात लवकर पुर्ण करावा, अन्यथा आंदोलनासाठी नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला.

 

Web Title: Shivaji Nagar subway remains sharp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.