संतापजनक ! मजुरांच्या वस्तीवर दरोडेखोरांचे थैमान; दोन महिलांवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2021 03:52 PM2021-10-20T15:52:52+5:302021-10-20T15:53:44+5:30

Robbers rape on two women: तोंडोळी शिवारातील गट क्रमांक ३१२ मधील शेतवस्तीवर बीहार राज्यातील मजुर घर करून राहतात.

Robbers attack on labor camp, rape on two women | संतापजनक ! मजुरांच्या वस्तीवर दरोडेखोरांचे थैमान; दोन महिलांवर अत्याचार

संतापजनक ! मजुरांच्या वस्तीवर दरोडेखोरांचे थैमान; दोन महिलांवर अत्याचार

Next

पैठण ( औरंगाबाद ) : बीडकीनपासून काही अंतरावर असलेल्या तोंडोळी शिवारातील शेतमजुराच्या वस्तीवर मंगळवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांनी मजुरांच्या घरात घुसून शस्त्राने पुरूषांना अमानुष मारहाण करत दोन महिलांवर अत्याचार ( Robbers rape on two women) केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मारहाणीत जखमी झालेल्या मजुरांना उपचारासाठी पोलिसांनी रूग्णालयात हलवले असून आरोपीच्या शोधासाठी नाकाबंदी करण्यात आली आहे. दरोडा व अत्याचाराच्या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

तोंडोळी शिवारातील गट क्रमांक ३१२ मधील शेतवस्तीवर बीहार राज्यातील मजुर घर करून राहतात. मंगळवारी मध्यरात्री शेतवस्तीवर ८ ते १० दरोडेखोरांनी हल्ला केला.  पुरुषांना शस्त्राने जबर मारहाण करत लुटमार केली... एवढेच नव्हे तर घरातील एक महिला व तरूणीवर अमानुष बलात्कार केला. यानंतर दरोडेखोर निघून गेले. घटनेतून सावरत एका मजुराने ही माहिती गावात फोन करून सांगितली. तोंडोळीचे सरपंच संजय गरड यांनी पोलीस पाटलासह वस्तीवर जाऊन पिडीत कुटुंबाला धीर दिला.

या घटनेची माहिती बीडकीन पोलीसांना देण्यात आली तातडीने बीडकीन चे सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने फौजदार राहुल पाटील, जमादार तांगडे, बापू दंडगव्हाळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रूग्णालयात हलवले. उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहूल, पोलीस अधीक्षक निमित गोयल व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीच्या शोधासाठी पोलीसांना सूचना केल्या. श्वानपथक व ठसे तज्ञ घटनास्थळी दाखल झाले असून जिल्हात नाकाबंदी करण्यात आली आहे.  सदर घटनेने शेतवस्तीवर राहणाऱ्या ग्रामस्थात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Robbers attack on labor camp, rape on two women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app