Resume collection of property taxes; Seizure action if money is not paid | मालमत्ता कराची वसुली पुन्हा सुरु; पैसे न भरल्यास जप्तीची कारवाई
मालमत्ता कराची वसुली पुन्हा सुरु; पैसे न भरल्यास जप्तीची कारवाई

ठळक मुद्देपैसे न भरल्यास जप्तीची कारवाई करण्यात येणार

औरंगाबाद: महापालिका दिवाळखोरीत निघालेली असताना प्रशासनाकडून मालमत्ता कर, पाणीपट्टी वसूली संदर्भात ठोस पावले उचलण्यात येत नाही. आज महापौर नंदकुमार घोडेले यांनी वसुलीची आढावा बैठक घेतली. उद्यापासून शहरात मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या नागरिकांकडे वसुलीसाठी पथक जाणार आहे. 

अलीकडेच कंत्राटी पद्धतीवर घेण्यात आलेले निवृत्त अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन यांच्याकडे तीन झोनचे काम देण्यात आले असल्याची माहिती महापौरांनी दिली. तसेच थकबाकीदारांना पैसे न भरल्यास जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. नगरसेवकांनी या वसुली अभियानात सहकार्य करावे अशी अपेक्षा मनपा आयुक्तांनी व्यक्त केली आहे.
 


Web Title: Resume collection of property taxes; Seizure action if money is not paid
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.