‘ट्राॅमा’तील व्हेंटिलेटरवरील रुग्णांना तब्बल अर्धा तास अंबू बॅगने कृत्रिम श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 01:29 AM2021-04-13T01:29:37+5:302021-04-13T01:30:07+5:30

Aurangabad : घाटीतील सर्जिकल इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ट्राॅमा केअर युनिट आहे. याठिकाणी शनिवारी दुपारपासून वीजपुरवठा विस्कळीत होण्याची समस्या सुरू झाली.

Patients on a trauma ventilator breathe artificially with a mango bag for half an hour | ‘ट्राॅमा’तील व्हेंटिलेटरवरील रुग्णांना तब्बल अर्धा तास अंबू बॅगने कृत्रिम श्वास

‘ट्राॅमा’तील व्हेंटिलेटरवरील रुग्णांना तब्बल अर्धा तास अंबू बॅगने कृत्रिम श्वास

googlenewsNext

औरंगाबाद : गंभीर रुग्णांसाठी व्हेंटिलेटर म्हणजे जीव वाचविणारी यंत्रणा... परंतु व्हेंटिलेटर अचानक बंद पडले तर काय, याचा विचारच न  केलेला बरा; परंतु या प्रकाराला सोमवारी भल्या पहाटे ३ वाजेच्या सुमारास घाटीतील ट्रॉमा केअर युनिटमधील रुग्णांना सामोरे जावे लागले. विद्युत यंत्रणेतील बिघाडाने येथील व्हेंटिलेटरवरील रुग्णांना तब्बल अर्धा तास अंबू बॅगने कृत्रिम श्वास देण्याची वेळ ओढवली. त्यामुळे नातेवाईक, डाॅक्टर, परिचारिकांची धावपळ उडाली. सुदैवाने यात कोणतीही गंभीर घटना घडली नाही.
घाटीतील सर्जिकल इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ट्राॅमा केअर युनिट आहे. याठिकाणी शनिवारी दुपारपासून वीजपुरवठा विस्कळीत होण्याची समस्या सुरू झाली. त्यामुळे अन्य बाजूच्या इमारतीतून वीजपुरवठा करण्यात आला. सोमवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास पुन्हा वीज यंत्रणेतील बिघाडाने पुरवठा विस्कळीत झाला. त्यामुळे व्हेंटिलेटर चालत नसल्याची बाब डाॅक्टर, परिचारिकांच्या लक्षात आली. तेव्हा याठिकाणी सहा रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. व्हेंटिलेटरमध्ये अशी काही अडचण आल्यास आणि कृत्रिम श्वासोच्छ्वास लागल्यास अंबू बॅगचा वापर करावा लागतो. त्यामुळे नातेवाईक, डाॅक्टर, परिचारिका, ब्रदर यांनी तत्काळ या रुग्णांना अंबू बॅगने कृत्रिम श्वास देण्यास सुरुवात केली. आमच्या रुग्णाला आम्ही आमच्या हाताने अंबू बॅगने कृत्रिम श्वास दिल्याचे एका नातेवाइकाने सांगितले.  
एक फ्यूज गेला होता. परंतु व्हेंटिलेटरवरील ६ रुग्णांना अंबू बॅग लावण्यात आले होते. 

भंडारा दुर्घटनेनंतरही 
भंडारा येथील दुर्घटनेनंतरही घाटीतील जुनाट विद्युत यंत्रणेची अवस्था ‘जैसे थे’ आहे. ट्रॉमा केअर युनिटमधील घटनेनंतर सोमवारी सकाळी याठिकाणी विद्युत यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.

Web Title: Patients on a trauma ventilator breathe artificially with a mango bag for half an hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.