लिंबेजळगाव येथे जीप अपघातात एकाचा जागीच मृत्य; चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 11:45 AM2020-01-31T11:45:03+5:302020-01-31T11:45:53+5:30

समोरचे भरधाव वाहन अचानक थांबल्याने झाला अपघात

One killed in jeep accident at Limbejalgaon; Four injured | लिंबेजळगाव येथे जीप अपघातात एकाचा जागीच मृत्य; चार जखमी

लिंबेजळगाव येथे जीप अपघातात एकाचा जागीच मृत्य; चार जखमी

googlenewsNext

लिंबेजळगाव :  भरधाव वेगात असणारे अज्ञात वाहनान अचानक थांबल्याने त्यामागून येणारी एक जीप त्यावर जोरदार धडकल्याने झालेल्या अपघातात एकजण जागीच मृत झाल्याची घटना शुक्रवारी ( ३१ ) पहाटे घडली. लिबेजळगाव येथील बसस्थानकाजवळ हा अपघात झाला असून रामेश्वर शेजुळ (२६) असे मृताचे नाव आहे. 

अपघातात जीपचा समोरचा भाग पूर्णपणे चेपला गेला आहे. यावरून अपघाताची भीषणता लक्षात येते आहे. अपघाताची माहिती मिळताच वाळूज पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जीपमधील जखमी सविता रामेश्वर शेजुळ, धृपदाबाई रीठे, भागीनाथ रीठे व अन्य एकजण  ( सर्व राहणार विसारवाडी ता पैठण ) यांना शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचारासाठी दाखल केले. 

Web Title: One killed in jeep accident at Limbejalgaon; Four injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.