जुना वाद उकरून काढला; सराईत गुन्हेगाराकडून युवकाची भोसकून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 09:46 AM2021-07-23T09:46:45+5:302021-07-23T09:50:23+5:30

Murder in Aurangabad : शहरातील संजयनगर येथील कॉर्नरवर कुख्यात गुन्हेगाराने दोन दिवसांपूर्वी वाद झाल्याचे प्रकरण उकरुन काढत हल्ला केला.

The old argument was dug up; A young man was stabbed to death by a criminal in Aurangabad | जुना वाद उकरून काढला; सराईत गुन्हेगाराकडून युवकाची भोसकून हत्या

जुना वाद उकरून काढला; सराईत गुन्हेगाराकडून युवकाची भोसकून हत्या

googlenewsNext

औरंगाबाद : सराइत गुन्हेगार असलेल्या शेख अरबाज उर्फ विशाल उर्फ भुर्या याने मंगेश दिनकर माळोदे (रा.२८,  संजयनगर) याचा भोसकून खून केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. जिंसी पोलिसांच्या पथकाने मध्यरात्री आरोपीला बेडया ठोकल्या आहेत.

शहरातील संजयनगर येथील कॉर्नरवर कुख्यात गुन्हेगाराने दोन दिवसांपूर्वी वाद झाल्याचे प्रकरण उकरुन काढत मंगेश माळोदे यांच्यासोबत वाद घातला. मंगेशने आई समोर शिविगाळ केली त्यामुळे भुर्याने त्याच्या डाव्या हातावर, डाव्या पायाच्या मांडीवर चाक़ूने हल्ला चढवला. यात चाकुचे घाव खोलवर घुसल्यामुळे मंगेश जागीच कोसळला. त्याला आजुबाजुच्या लोकांना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, जिन्सी पोलिस ठाण्यात नाइट ड्यूटीला असणारे पोलीस उपनिरीक्षक गोकुळ ठाकुर यांना खबरीमार्फत आरोपी परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. तेव्हा दोन कर्मचार्यांच्या मदतीने कुख्यात आरोपी भुर्याला मध्यरात्री अटक केली.  पकडून आणल्यानतर त्यांच्यावर पहाटे खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देत पाहणी केली.

Web Title: The old argument was dug up; A young man was stabbed to death by a criminal in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.