Notice to 14 hospitals for charging extra bills | अतिरिक्त बिल आकारल्याने १४ रूग्णालयांना नोटीस

अतिरिक्त बिल आकारल्याने १४ रूग्णालयांना नोटीस

औरंगाबाद : राज्य शासनाने कोरोना रूग्णावर उपचार करताना रूग्णालयांनी आकारावयाचे दर निश्चित केलेले आहेत. पण तरीही शहरातील १४ रूग्णालयांनी ६५६ कोरोना रूग्णांकडून ६२ लाख ३३ हजार इतकी जास्तीची  रक्कम आकारल्याने जिल्हाधिकारी  सुनील चव्हाण यांनी  या रूग्णालयांना  कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

सात दिवसांमध्ये संबंधित रूग्णालयांनी समाधानकारक उत्तर न दिल्यास व बिल कमी करण्याबाबत आवश्यक ती कारवाई न केल्यास कायद्यानुसार दंडाची अथवा फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. अजंता हॉस्पिटल, सिग्मा हॉस्पिटल, एशियन सिटी केअर सुपर स्पेशालिटी, धूत हाॅस्पिटल, ओरियन सिटी केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हयात हॉस्पिटल, डॉ. हेडगेवार हॉस्पिटल,  कृष्णा हॉस्पिटल, लाईफलाईन हॉस्पिटल, एमआयटी हॉस्पिटल, वुई केअर नर्सिंग होम, एकविरा हाॅस्पिटल,  वायएसके हॉस्पिटल,  अपेक्स हॉस्पिटल  यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली  आहे

लाईफलाईन हॉस्पिटलला रूग्णांचे तीन लाख तीस हजार रूपये परत करण्याबाबत नोटीस बजावली होती. त्यानुसार रूग्णालयाने रूग्णांडून घेतलेली अतिरिक्त रक्कम परत केली आहे. 

Web Title: Notice to 14 hospitals for charging extra bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.