कर वसुलीचा नवा उच्चांक, महापालिकेने एकाच दिवसात पावणे दोन कोटी केले वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 04:40 PM2021-10-14T16:40:55+5:302021-10-14T17:04:00+5:30

प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर वसुलीसाठी वॉर्डनिहाय कर्मचाऱ्यांचे पथक स्थापन केले.

New high of tax collection, Aurangabad Municipal Corporation recovered Rs 1.76 crore in a single day | कर वसुलीचा नवा उच्चांक, महापालिकेने एकाच दिवसात पावणे दोन कोटी केले वसूल

कर वसुलीचा नवा उच्चांक, महापालिकेने एकाच दिवसात पावणे दोन कोटी केले वसूल

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोना काळानंतर वसुलीचा नवा उच्चांकपथक घरोघरी जाऊन कर वसुली करीत आहे.

औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने ( Aurangabad Municipal Corporation ) मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी कंबर ( Tax Collection ) कसली आहे. थकबाकी, चालू आर्थिक वर्षाचा कर वसूल करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. कोरोना संसर्गामुळे वसुलीने तळ गाठला होता. आता एकाच दिवसात पावणे दोन कोटी रुपयांची वसुली ( New high of tax collection) केल्याचे उपायुक्त तथा कर निर्धारक व संकलक अधिकारी अपर्णा थेटे यांनी सांगितले. 

प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर वसुलीसाठी वॉर्डनिहाय कर्मचाऱ्यांचे पथक स्थापन केले. पथक घरोघरी जाऊन कर वसुली करीत आहे. नागरिकही कर भरण्यासाठी सहकार्य करीत आहेत. आतापर्यंत ६२ कोटींपेक्षा अधिक वसुली झाली आहे. सोमवारी एकाच दिवसात दीड कोटींपेक्षा जास्त कर वसुली करण्यात आली. त्यात पाच वॉर्ड कार्यालयाची वसुली ही २० लाखांपेक्षा जास्त आहे. यावर्षी दोनशे कोटी रुपये कर वसूूल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार नियोजन केले असून, उद्दिष्ट पूर्ण होईल, असा विश्वास थेटे यांनी व्यक्त केला.

चेक बाऊन्स होताच...
मालमत्ता कर वसुली करताना मालमत्ताधारकांकडून देण्यात आलेले चेक बाऊन्स होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे महापालिकेने फसवणूक केल्याप्रकरणी कलम १३८ नुसार कारवाई सुरू केली. कर भरणा करण्यासाठी नोटीस बजावताच दोन मालमत्ताधारकांनी वॉर्ड कार्यालयात जाऊन कराचा भरणा केला.

‘ते’झोन कारवाईच्या रडारवर
मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीत प्रत्येक झोनचा आढावा प्रशासक घेत आहेत. सर्वांत कमी वसुली असलेल्या वॉर्ड कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

एका दिवसातील झोननिहाय वसुली
झोन- वसुली(लाखात)
१-            २०,३९,८१७
२-            १३,०३,९७७
३- ०४,८१,८०७
४-            १२,४५,४८७
५-            २७,८१,४०१
६-            २३,१०,४६१
७-            २७,८३,६७९
८- १८,००,०००
९-            २९,२४,५०२
एकूण- १,७६,७१,१३१

Web Title: New high of tax collection, Aurangabad Municipal Corporation recovered Rs 1.76 crore in a single day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.