संशयाची सुई ! रॅकेटमध्ये आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा सहभाग?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 01:08 PM2021-03-01T13:08:26+5:302021-03-01T13:11:39+5:30

crime news पोलिसांनी अभ्यासिकेवर छापा टाकून प्रश्नपत्रिकेच्या झेरॉक्स प्रती आणि अन्य साहित्य जप्त केले आहे.

The needle of suspicion ! Involvement of health department employees in exam racket ? | संशयाची सुई ! रॅकेटमध्ये आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा सहभाग?

संशयाची सुई ! रॅकेटमध्ये आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा सहभाग?

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांना सापडली पदांसह आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नावांची कागदपत्रेपोलिसांनी आरोग्य विभागाला दूर ठेवून केली कारवाई

औरंगाबाद : खोकडपुरा येथील अभ्यासिकेत आरोग्य विभागाच्या परीक्षेत उत्तरे पुरविणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांना या ठिकाणाहून काही आरोग्य कर्मचाऱ्यांची पदांसह नावे असलेली कागदपत्रे सापडली आहेत. त्यामुळे या रॅकेटमध्ये आरोग्य विभागातील काही कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पोलिसांनी अभ्यासिकेवर छापा टाकून प्रश्नपत्रिकेच्या झेरॉक्स प्रती आणि अन्य साहित्य जप्त केले आहे. याठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांची नावे असलेली कागदपत्रे आढळली आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांची नावे पाहून पोलिसांनाही क्षणभर धक्का बसला होता. या कागदपत्रांवर संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांकही नमूद केलेले होते. त्यामुळे संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून, त्यांच्या मदतीने हा प्रकार सुरू होता, अशा संशय व्यक्त होत आहे. पोलीस तपासातून यात कोण कोण सहभागी आहेत, हे स्पष्ट होईल. या सगळ्या प्रकाराने आरोग्य विभागातील पदभरतीवरच प्रश्न उपस्थित केला जात आहे. उपसंचालक डाॅ. स्वप्निल लाळे म्हणाले, या प्रकरणात आरोग्य कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे की नाही, हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल.

आरोग्य विभागाला दूर ठेवून कारवाई
पोलिसांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना कोणतीही कल्पना न देता अभ्यासिकेवर छापा टाकला. संपूर्ण कारवाई होईपर्यंत आरोग्य विभागाला यासंदर्भात काहीही माहिती देण्यात आलेली नव्हती.

Web Title: The needle of suspicion ! Involvement of health department employees in exam racket ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.