नाशिक पाठोपाठ अहमदनगरचे पाणी जायकवाडीत दाखल; जलसाठा पोहचला ६२ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 08:19 PM2021-09-14T20:19:25+5:302021-09-14T20:22:44+5:30

गोदावरी व प्रवरेचे पाणी एकत्रितपणे दाखल झाल्यानंतर आवक मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.

Nashik followed by Ahmednagar water entering Jayakwadi Dam; Water storage reached 62% | नाशिक पाठोपाठ अहमदनगरचे पाणी जायकवाडीत दाखल; जलसाठा पोहचला ६२ टक्क्यांवर

नाशिक पाठोपाठ अहमदनगरचे पाणी जायकवाडीत दाखल; जलसाठा पोहचला ६२ टक्क्यांवर

googlenewsNext
ठळक मुद्देअहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातून विसर्गास प्रारंभबुधवारपासून नाथसागरात मोठी आवक होणार

पैठण : अहमदनगर जिल्हातील धरण समुहातून  जायकवाडी धरणासाठी  आज सकाळी मोठ्या क्षमतेने विसर्ग सुरू करण्यात आले. नाशिक पाठोपाठ अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्यात आल्याने बुधवारपासून नाथसागरात मोठी आवक होणार असल्याचे जायकवाडीचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले. मंगळवारी सायंकाळी धरणात २५१८५ क्युसेस आवक सुरू होती तर जलसाठा ६२% झाला होता. 

नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून जायकवाडी धरणासाठी २६१४६ क्युसेस क्षमतेने विसर्ग सुरू असताना आज अहमदनगर जिल्हातील  भंडारदरा ३२५२ क्युसेस, निळवंडे ६३७३ क्युसेक्स,  मुळा १०७५ क्युसेस व ओझर वेअर मधून प्रवरेत २०९०१ क्युसेस असा मोठा विसर्ग मंगळवारी सकाळी ८ वाजेपासून सुरू करण्यात आला. यामुळे प्रवरा नदीस पुर आला असून  मंगळवारी मध्यरात्री हे पाणी जायकवाडी धरणात दाखल होईल असे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील दारणा १२७८८ क्युसेस, कडवा ४२४० क्युसेस, आळंदी ८० क्युसेस, वालदेवी ५९९ क्युसेस, गंगापूर २२१२ क्युसेस,  व नांदूर मधमे्श्वर वेअर मधून २६२४६ असा विसर्ग गोदावरी पात्रात सुरू आहे. 

गोदावरी व प्रवरेचे पाणी एकत्रितपणे दाखल झाल्यानंतर आवक मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. मंगळवारी सायंकाळी धरणाची पाणी पातळी १५१४.३१ फूट झाली होती. धरणात एकूण जलसाठा २०८४.०६६ दलघमी (७३.५९ टिएमसी) तर उपयुक्त जलसाठा १३४६.०६६ दलघमी (४७.५३ टिएमसी) झाला आहे. गोदावरीसह प्रवरेची आवक झाल्यानंतर धरणाच्या जलसाठ्यात गतीने वाढ होईल असे गणेश खराडकर व बबन बोधणे यांनी सांगितले.

Web Title: Nashik followed by Ahmednagar water entering Jayakwadi Dam; Water storage reached 62%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.