खाम नदीपात्रातील २०० कुटुंबांना हलविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 02:27 PM2020-09-27T14:27:17+5:302020-09-27T14:27:49+5:30

नदीच्या पात्रात सुमारे २०० जणांनी अतिक्रमण करून घरे बांधली असल्याचे यावेळी लक्षात आले. पावसाळ्यात अतिक्रमणे पाडता येत नाहीत. त्यामुळे  या घरांमध्ये राहणाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी प्रगती कॉलनी  येथील महापालिकेच्या शाळेची निवड  करण्यात आली. 

Moved 200 families in Kham river basin | खाम नदीपात्रातील २०० कुटुंबांना हलविले

खाम नदीपात्रातील २०० कुटुंबांना हलविले

googlenewsNext

औरंगाबाद : हर्सूल तलाव ओव्हरफ्लो होऊन खाम नदीला पूर आला. त्यामुळेनदीच्या पात्रात घरे बांधून राहणाऱ्या सुमारे दोनशे कुटुंबांना शनिवारी  महापालिकेने सुरक्षित स्थळी हलविले. त्यांच्या घरातील साहित्य  ठेवण्यासाठी शाळेच्या खोल्यांची  व्यवस्थादेखील करून दिली.  जेसीबी आणि  पोकलेनच्या साहाय्याने पाण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला. 

जलाल कॉलनी, हिलाल कॉलनी, आरेफ कॉलनी या भागातील ज्या नागरिकांनी नदीच्या पात्रात घरे बांधली होती त्या नागरिकांचे हाल झाले. त्यांनी  संपूर्ण रात्र जागून काढली. पुराची माहिती मिळाल्यावर पालिकेच्या वॉर्ड क्रं. ४ च्या कार्यालयतील कर्मचाऱ्यांना तातडीने पाहणी करून मदत करण्याचा  प्रयत्न केला. पण रात्रीमुळे ते शक्य झाले नाही. 

नदीच्या पात्रात सुमारे २०० जणांनी अतिक्रमण करून घरे बांधली असल्याचे यावेळी लक्षात आले. पावसाळ्यात अतिक्रमणे पाडता येत नाहीत. त्यामुळे  या घरांमध्ये राहणाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी प्रगती कॉलनी  येथील महापालिकेच्या शाळेची निवड  करण्यात आली. 

जेसीबी आणि पोकलेनच्या साहाय्याने नदीपात्रातील पाण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला. घरांचे बांधकाम न पाडता आजूबाजूचे बांधकाम हटवून हे काम करण्यात आल्याची माहिती वॉर्ड अधिकारी नंदकिशोर भोंबे यांनी दिली. 

Web Title: Moved 200 families in Kham river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.