टेकडीवरील मॉर्निंग वॉक बेतला जीवावर; पाय घसरून खदानीत पडल्याने तरुणीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 01:35 PM2019-12-18T13:35:42+5:302019-12-18T13:41:16+5:30

अचानक पाय घसरल्याने तरुणी डोंगरावरून खाली पडली

Morning Walk on the Hill to death; Young woman dies after falling off a foot | टेकडीवरील मॉर्निंग वॉक बेतला जीवावर; पाय घसरून खदानीत पडल्याने तरुणीचा मृत्यू

टेकडीवरील मॉर्निंग वॉक बेतला जीवावर; पाय घसरून खदानीत पडल्याने तरुणीचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देडोंगराखालील खदानीत उंचावरून पडल्याने तरुणी गंभीर जखमी झाली

औरंगाबाद : पोलीस खात्यात भरती होण्यासाठी मैदानी सराव करण्यासाठी  तीसगावच्या खवड्या डोंगरावर गेलेल्या 22 वर्षीय तरुणीचा पाय घसरून 100 फूट खोल खदानीत पडल्याने मृत्यू  झाल्याची घटना बुधवारी (दि. १८ ) सकाळी घडली. सुनीता देविदास शेळके वय-22 (रा.रांजणगाव  शेनपुंजी) असे मृत्यू तरुणीचे नाव आहे.

या विषयी मृत तरुणीचा भाऊ भीमराव शेळके यांनी दिलेली अधिक माहिती अशी की,  सुनीताच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे घराची सर्व जबाबदारी त्याचा भाऊ भीमराव उचलायचा. सुनीताला पोलीस व्हायचे होते. तिचे स्वप्न होते की, पोलीस होऊन घराच्या हालाखीच्या परिस्थितीतून परिवाराची सुटका करायचे. त्यामुळे सहा दिवसांपूर्वी ती नांदेडवरून आल्यानंतर  लहान बहीण शिल्पा आणि मावस भाऊ रामेश्वर गिरी यांच्या सोबत रोज पहाटे मैदानी सरावासाठी जायची.

आज सकाळी तिघांनीही सराव केला व खाली आले. त्या नंतर शिल्पा आणि सुनीता या दोघी पुन्हा डोंगरावर धावण्यासाठी गेल्या मात्र धावताना सुनिताचा पाय घसरला आणि ती खवड्या डोंगरावरून शंभरफुट खाली खदानीत पडली. यावेळी तिच्या डोक्यावर गंभीर जखम झाल्याने मोठ्याप्रमाणावर रक्तस्त्राव झाला. यानंतर तेथील नागरिकांनी सुनीताला तातडीने घाटी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र तेथे वैधकीय अधिकाऱ्यांनी तपासून सुनीताला मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Morning Walk on the Hill to death; Young woman dies after falling off a foot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.