More corona-free than affected | बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक

बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी पुन्हा एकदा कोरोाबाधितांच्या आकडेवारीपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक राहिली आहे. यामुळे प्रशासन आणि नागरिकांनाही दिलासा मिळाला.

शुक्रवारी जिल्ह्यात १६९ कोरोनाबाधित आढळून आले तर ६ बाधितांचा मृत्यू झाला. शुक्रवारी दिवसभरात ४२९ जणांना सुटी देण्यात आली, अशी  माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

या आकडेवारीसह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ३४ हजार १० झाली असून आतापर्यंत २८ हजार २४३ कोरोनाबाधित  बरे झाले  आहेत.  तर एकूण ९४८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात ४८१९ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. 

तर शुक्रवारी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत १ हजार ८८ कोरोना रूग्णांची नव्याने भर पडली असून ३० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

Web Title: More corona-free than affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.