Minor girl raped by truck driver in Lasur | ट्रक चालकाचा घर मालकाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार;ओडिसाला पळवून नेताना झाली अटक

ट्रक चालकाचा घर मालकाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार;ओडिसाला पळवून नेताना झाली अटक

ठळक मुद्देपीडितेचे आई वडील शेतात असल्याचा घेतला गैर फायदा

लासूर स्टेशन: भाडेकरू असलेल्या 26 वर्षीय ट्रक ड्रायव्हरने घरमालकाच्या 12 वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अनेक वेळा बलात्कार केला. यानंतर तिला साथीदाराच्या मदतीने ओडीसाला पळवून नेत असताना शिल्लेगाव पोलिसांनी बुधवारी पहाटे त्याच्या मुसक्या आवळल्या. मनोज भिकन नागुंर्डे (वय26) रा. लासूर स्टेशन, विनोद लक्ष्मण जाधव (वय31) रा. वाळूज असे दोन्ही आरोपींचे नावे आहेत. 

या बाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, लासूर स्टेशन येथे आरोपी मनोज गांगुर्डे हा एक वर्षापासून पीडितेच्या घरी भाड्याने राहायला आलेला आहे. पीडीतेचे आई-वडील हे शेती कामानिमित्त बाहेरगावी जाऊन राहतात या संधीचा फायदा घेऊन गेल्या डिसेंबर महिन्यापासून आरोपीने पीडितेवर अत्याचार केले. 

गेल्या मार्च महिन्यात 29 तारखेला आरोपी मनोज याने पीडितेला फोन करून आपण पळून जाऊन लग्न करू असे आमिष दिले. यानंतर पीडिता, मनोज व त्याचा साथीदार विनोद लक्ष्मण जाधव हे वैजापूर रोडवरून ओडीसाला निघाले. दरम्यान, याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार शिल्लेगाव पोलीस ठाण्यात नोंदवली. त्यावरून पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपी पीडितेला सोबत घेऊन पुणे येथून सिल्लोड बुलढाणा मार्गे ओडिसा येथे जाणार असल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, पोलिस निरीक्षक सय्यद शौकत अली, सहायक पोलिस निरीक्षक सतीश दिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या हरिश्चंद्र नरके,सुनील दांडगे,अनिल दाभाडे, बाबा शेख यांनी ट्रक ( एम. एच 17 बी वाय 1784 ) मधून जात असलेल्या दोन आरोपी सह पिडीतेला लोणार तालुक्यातील बीबी येथून पहाटे 3 वाजता ताब्यात घेतले. याप्रकरणी पोस्को कायद्यांतर्गत दोन आरोपींविरोधात पीडितेच्या जबाबावरून शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश दिंडे हे पुढील तपास करीत आहे

Web Title: Minor girl raped by truck driver in Lasur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.