Exciting! An old man was stabbed to death in Bajajnagar | खळबळजनक ! बजाजनगरात वृद्धाचा डोक्यात वार करून खून

खळबळजनक ! बजाजनगरात वृद्धाचा डोक्यात वार करून खून

औरंगाबाद - वाळूज एमआयडीसी मधील बजाजनगर येथील  पद्मपाणी बुद्ध विहारासमोर  ५५ ते ६०  वर्षीय वृद्धाचा खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी पहाटे सहा वाजता समोर आली. सोमनाथ आनंद राठोड (रा. आडगाव,पळशी ) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एका संशयितास ताब्यात घेतले आहे.  

बजाजनगरात बुद्ध विहारासमोर अनोळखी वृद्धाच्या डोक्यात प्रहार करून करुन खून केलेल्या अवस्थेतील मृतदेह  परिसरातील   वॉचमनच्या निदर्शनास आला. त्यांनी ही घटना  पोलिसांना  कळवली. त्यानुसार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सांगितले की, ६० वर्षीय वृद्धाच्या डोक्यात प्रहार करण्यात आले आहेत. यामुळे मोठा रक्तस्त्राव होऊन वृद्धाचा मृत्यू झाला असावा. घटनास्थळी श्वानपथक पाचारण करण्यात आले. तपास एमआयडीसी वाळूज पोलीस करत आहेत.

एका संशयितास अटक 
बजाजनगर खून प्रकरणातील मयताची पोलिसांना काही तासातच यश आले आहे. सोमनाथ राठोड असे मृताचे नाव आहे. त्यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. ते उद्योग नगरीत मिळेल ते काम करून निवारा दिसेल तिथे राहत असत. मारेकऱ्यांनी राठोड यांच्या डोक्यात लाकडी दांड्याने जोरदार वार केले आहेत. मोठा रक्तस्राव होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनास्थळी गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे आदिनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.

Web Title: Exciting! An old man was stabbed to death in Bajajnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.