Due to torrential rains, 80 villages lost contact in Soygaon taluka | सोयगाव तालुक्यात पुरात बुडणाऱ्या दोघांना वाचविण्यात यश; ८० गावांचा संपर्क तुटला
सोयगाव तालुक्यात पुरात बुडणाऱ्या दोघांना वाचविण्यात यश; ८० गावांचा संपर्क तुटला

सोयगाव : तालुक्यात बुधवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील जवळपास सर्वच नद्या, नाल्यांना पुराचे स्वरूप प्राप्त झाले होते. यामुळे तालुक्यातील ८० गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या दोघांना वाचविण्यात यश आले आहे. 

सोयगाव-चाळीसगाव राज्यमार्गावरील सर्वच नद्यांना पूर आल्याने या रस्त्यावरील वाहतूक दिवसभर ठप्प झाली होती. बहुला(बहुलखेडा)नदीने आक्राळविक्राळ रूप धारण केल्याने पुराचे पाणी शेतात शिरले होते. दरम्यान बनोटी मंडळात अतिवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात येत असून दुपारपर्यंत आकडेवारी हाती आलेली नव्हती. पिकांमध्ये पाणी शिरले होते. पावसाचा जोर अधिक असल्याने संपूर्ण तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

प्रशासन पाहणीवर
दुपारी उशिरापर्यंत प्रशासनाकडून बनोटी मंडळातील मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तहसीलदार प्रवीण पांडे यांच्या पथकाने काही गावांना भेटी दिल्या. पूरग्रस्त गावांनाही भेटी देण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या दोघांना वाचविण्यात यश
वनगाव येथील नदीवरील पुलावरून पाणी वाहत असताना अंबादास दुबे(वय ३८)व सचिन दुबे(वय २२) दोघेही दुचाकीवरून जात होते. यावेळी दुचाकीसह वाहून जात दोघांनाही ग्रामस्थांनी वाचविले आहे.

Web Title: Due to torrential rains, 80 villages lost contact in Soygaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.