death of Two injured in accident on Nashik Road | नाशिक रोडवरील अपघातातील दोन जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू
नाशिक रोडवरील अपघातातील दोन जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू

औरंगाबाद: मिटमिटा रस्त्यावर ८ आॅक्टोबर रोजी दुपारी रिक्षा आणि मोटारसायकल अपघातात जखमी सहा जणांपैकी  दोन जणांचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात शनिवारी पहाटे मृत्यू झाला. याविषयी छावणी पोलीस ठाण्यात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अंकुश केशवराव दाणे (२१) आणि नंदू प्रकाश नरवडे (३३,रा.  आंबेडकरनगर, मूळ रा. बिडकीन)अशी मृताची नावे आहेत. या अपघातातील जखमी केशवराव खंडूजी दाणे (६०)यांच्यावर उपचार सुरू आहेत. याविषयी छावणी पोलिसांनी सांगितले की, ८ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मिटमिटा रस्त्यावर रिक्षा आणि मोटारसायकलमध्ये जोराचा अपघात झाला होता.

या घटनेत दुचाकीस्वार  नंदू नरवडे त्यांची पत्नी, दोन लहान मुली आणि  रिक्षाचालकासह तीन प्रवासी जखमी झाले होते. तर  दाणे पिता-पुत्र रिक्षातून प्रवास करीत होते. या अपघातानंतर सर्व जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान अंकुश दाणे आणि नंदू नरवडे यांचा शनिवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास अंत झाला. या अपघाताचा तपास पोलीस उपनिरीक्षक ठोकळ, पोहेकॉ भास्कर नागरे करीत आहेत.


Web Title: death of Two injured in accident on Nashik Road
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.