कोरोनानंतर ‘बर्ड फ्ल्यू’चे संकट; मराठवाडयातील पोल्ट्री व्यवसायावर संक्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 12:28 PM2021-01-12T12:28:19+5:302021-01-12T12:32:14+5:30

‘bird flu’ in Marathwada शासनाच्या सूचना येण्यापूर्वीच अनेक ठिकाणच्या पोल्ट्रीतील नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

Crisis of ‘bird flu’ after corona; Big loss to poultry business in Marathwada | कोरोनानंतर ‘बर्ड फ्ल्यू’चे संकट; मराठवाडयातील पोल्ट्री व्यवसायावर संक्रात

कोरोनानंतर ‘बर्ड फ्ल्यू’चे संकट; मराठवाडयातील पोल्ट्री व्यवसायावर संक्रात

googlenewsNext
ठळक मुद्देतर १ किलोमीटरपर्यंतच्या परिसरातील पोल्ट्रींमधील पक्षी नष्ट करणार लातूर, परभणी जिल्ह्यातील नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. ‘इंटरमिक्सिंग आॅफ बर्ड्स’ थांबविण्याच्या सूचना केल्या आहेत

औरंगाबाद : मराठवाड्यात ‘बर्ड फ्ल्यू’च्या संक्रमणाचा धोका वाढला असून, यामुळे पोल्ट्री व्यवसायावर संक्रांत आली आहे. या साथरोगाच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सोमवारी विभागातील पोल्ट्री फार्म आणि सद्यस्थितीचा आढावा घेतला.

इंटरमिक्सिंग आॅफ बर्ड्स थांबविण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. तसेच १ कि़लोमीटर अंतरातील पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांची तपासणी केल्यानंतर जर त्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याचे निष्पन्न होत असेल, तर ते पक्षी नष्ट करण्याबाबतदेखील विचार सुरू झाला आहे. मराठवाड्यात बर्ड फ्ल्यू आला आहे, हे निश्चित आहे. यापूर्वी पक्ष्यांमध्ये हा आजार येऊन गेला आहे. कोरोनाप्रमाणेच प्राण्यांमध्ये या आजाराचे संक्रमण होते. त्यामुळे प्रशासनाने दक्षतेने काम करण्याची तयारी सुरू केली आहे. प्रशासकीय सुत्रांनी सांगितले की, आज बैठक घेऊन सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. सर्व पोल्ट्रींची तपासणी करण्याचे नियोजन आहे. एक कि़लोमीटर अंतरातील पोल्ट्रींबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. शासनाच्या सूचना येण्यापूर्वीच अनेक ठिकाणच्या पोल्ट्रीतील नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. लातूर, परभणीचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. जिथे-जिथे धोक्याची शक्यता आहे, तेथील नमुने संकलनाचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच ‘इंटरमिक्सिंग आॅफ बर्ड्स’ थांबविण्याच्या सूचना केल्या आहेत. मराठवाड्यात बर्ड फ्ल्यू आलेला आहे, हे निश्चित झाले आहे. यापूर्वी पक्ष्यांमध्ये हा आजार येऊन गेला आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतला आढावा
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रात्री ८ वाजता विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी बर्ड फ्ल्यूच्या अनुषंगाने चर्चा करून माहिती जाणून घेतली. यावेळी विभागात कोरोना लसीकरणाबाबत काय तयारी झाली आहे, याचाही त्यांनी आढावा घेतला. बर्ड फ्ल्यूच्या अनुषंगाने जिल्हानिहाय परिस्थितीबाबत समन्वयाने खबरदारी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. या व्हि. सी.ला विभागातील सर्व जिल्हाधिकारी आणि महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Crisis of ‘bird flu’ after corona; Big loss to poultry business in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.