coronavirus: The number of coronavirus deaths in Aurangabad is 76 | coronavirus : औरंगाबादमध्ये कोरोनाबळींचा आकडा ७६ वर

coronavirus : औरंगाबादमध्ये कोरोनाबळींचा आकडा ७६ वर

औरंगाबाद : बायजीपुरा येथील ६० वर्षीय पुरुष व एकनाथ नगर येथील ६६ वर्षीय महिलेचा रविवारी रात्री कोरोनामुळे मृत्यू झाला. तर बेगमपुरा येथील ६४ वर्षीय महिला आणि बारी कॉलनी येथील ६३ वर्षीय व्यक्तीचा सोमवारी दुपारी मृत्यू झाल्याने शहरात २४ तासात कोरोनाचे चार बळी गेल्याचे पुढे आले आहे. यामुळे शहरातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आतापर्यंतचा आकडा ७६ वर गेला आहे. 

बेगमपुरा येथील ६४ वर्षीय वृद्ध महीलेला ११ मे पासून खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्याना कोरोनाची लागण झाल्याचे १३ मे रोजी समोर आले. तेव्हापासून त्यांना कृत्रीम श्वास देण्यात आलेला होता. त्यांचे अनेक अवयव निकामी झाले. तसेच कोरोनासह न्युमोनियामुळे सोमवारी दुपारी दोन वाजता मृत्यू झाला. 

तर ६३ वर्षीय बारी कॉलनी येथील व्यक्तीस ३० मे रोजी खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. ३१ मे रोजी त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कोरोनामुळे त्याचा सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता मृत्यू झाला, असे खाजगी रुग्णालयाकडून कळवण्यात आले. यामुळे चोवीस तासांत चार मृत्यू झाले असून आतापर्यंतच्या मृत्यूचा आकडा ७६ झाला आहे.

Web Title: coronavirus: The number of coronavirus deaths in Aurangabad is 76

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.