CoronaVirus: alcoholics patience ended? A Deshi liquor store robbed, 150 boxes looted | CoronaVirus : तळीरामांची सहनशिलता संपली..?; देशी दारूचे दुकान फोडून दीडशे बॉक्स पळवले

CoronaVirus : तळीरामांची सहनशिलता संपली..?; देशी दारूचे दुकान फोडून दीडशे बॉक्स पळवले

ठळक मुद्दे3 लाख 78 हजार रुपयांचे 152 बॉक्स दारू पळवली

सिल्लोड : तालुक्यातील  मानिकनगर येथील 
देशी दारूचे दुकान चोरट्यानी शटर उचकटून फोडले. दुकानात असलेले 3 लाख 79 हजार रुपये किंमतीचे 152 दारूचे बॉक्स चोरट्यांनी लंपास केले. ही घटना रविवारी रात्री घडली.या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

औरंगाबाद- सिल्लोड रस्त्यालगतच्या वळणावरील शोभाबाई जैस्वाल यांचे  देशी दारूचे दुकान आहे. रविवारी मध्यरात्री शटर उचकटवून दुकानात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी चोरट्यानी देशी दारूचे 152 बॉक्स लंपास केले. या चोरलेल्या दारूची किंमत तीन लाख आठयाहत्तर हजार रुपये इतकी आहे. 

दरम्यान चोरट्यांनी दुकानाच्या आत व बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नासधूस करून डिव्हीआर सुद्धा पळवून नेला. याबाबत सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून सपोनि किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास, फौजदार आढे,  जमादार दादाराव पवार हे करित आहेत.

 
17 बॉक्स सोडले...
चोरट्यांनी 152 बॉक्स दारू पळवले आहेत, मात्र चोरट्यांनी 17 बॉक्स दारू दुकानातच ठेवली. कदाचीत चोरीत वापरलेल्या   वाहनात सर्व दारू बसत नसल्याने त्यांनी 17 बॉक्स सोडून दिले असावे असा पोलिसांचा अंदाज आहे.

Web Title: CoronaVirus: alcoholics patience ended? A Deshi liquor store robbed, 150 boxes looted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.