coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात गुरूवारी ३३५ रूग्ण पॉझिटिव्ह; ६ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 12:12 AM2020-08-14T00:12:47+5:302020-08-14T00:14:56+5:30

जिल्ह्यात १३ हजारांवर रूग्ण बरे झाले आहेत.

coronavirus: 335 patients tested positive in Aurangabad district on Thursday; Death of 6 patients | coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात गुरूवारी ३३५ रूग्ण पॉझिटिव्ह; ६ रुग्णांचा मृत्यू

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात गुरूवारी ३३५ रूग्ण पॉझिटिव्ह; ६ रुग्णांचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देसध्या ४१४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेतआतापर्यंत ५७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे

औरंगाबाद : जिल्ह्यात तिनशेवर रूग्ण आढळणे सुरूच असून, गुरुवारी दिवसभरात ३३५ नव्या रुग्णांची भर पडली. तर ६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

जिल्ह्यात मार्चपासून आतापर्यंत आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १७,९६७ एवढी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १३, २५४ रूग्ण बरे झाले आहेत. तर ५७२ जणांचा मृत्यू झाल्याने सध्या ४१४१ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

 शांतीपुरा-छावणी येथील ६५ वर्षीय पुरुष, नांदर-औरंगाबाद येथील ८० वर्षीय पुरुष, पानवडोद-सिल्लोड येथील ५० वर्षीय पुरुष, समतानगर-सिल्लोड येथील ७५ वर्षीय पुरुष, आंबेडकरनगर,सिडको येथील ७० वर्षीय पुरुष, छावणीतील ८० वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली. 

जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात मनपा हद्दीतील ८१ आणि ग्रामीण भागांतील १७५ रुग्णांना सुटी देण्यात आली.

मनपा हद्दीतील रूग्ण
नाईकनगर १, हनुमाननगर १, बीड बायपास १, पवननगर १ शहानूरवाडी २, पडेगाव २, एकनाथनगर १, नागसेननगर २, सुयोग कॉलनी १, रशीदपुरा १, आंबेडकरनगर,सिडको २, एन अकरा, सुभाषचंद्र बोस नगर, हडको १, जालननगर १, घाटी परिसर ३, सब्जी मंडी, खोकडपुरा १, बेगमपुरा १, गणेश कॉलनी ६, भावसिंगपुरा १, शिवाजीनगर २, राधास्वामी कॉलनी, हर्सुल ३, सिंधी कॉलनी ४, बालाजीनगर १, जयभवानीनगर ४, एन आठ,सिडको २, आरोग्य केंद्र परिसर, एन आठ ४, म्हाडा कॉलनी १, न्यू एस टी कॉलनी १, पहाडी कॉर्नर १, नक्षत्रवाडी १, सैनिक कॉलनी, पहाडसिंगपुरा १, रोजाबाग, सिडको १, शहानगर, बीड बायपास रोड १, मयूर पार्क २, रेवती सो., इटखेडा १, अन्य १, शिवाजीनगर १, कैसर कॉलनी १ , टिळक रोड १, हिमायत बाग परिसर १, क्रांतीनगर १, जय भारत कॉलनी, चिकलठाणा १, एन सहा सिडको २, घाटी परिसर २, हिमालय मॉल परिसर १ अन्य १, भारतनगर १, समर्थनगर १.

ग्रामीण भागातील रूग्ण
शिवनेरी कॉलनी, रांजणगाव ३, गणेशनगर, रांजणगाव शेणपूजी १, बनोटी सोयगाव १, बजाजनगर २, मधुबन सो., बजाज नगर १, म्हाडा कॉलनी, बजाजनगर १, सिद्धीविनायक विहार, बजाजनगर १, महादेव मंदिराजवळ, गुरूधानोरा १, शिवनेरी कॉलनी, रांजणगाव १, साईनगर, सिडको १, भारतनगर, घाणेगाव १, पिंप्री राजा, करमाड ३, खंडोबा मंदिर, गंगापूर १, मार्केट यार्ड, गंगापूर २, विठ्ठल मंदिराजवळ, गंगापूर २, जामगाव, गंगापूर १, देवळे गल्ली, गंगापूर २, वैजापूर १, मारवाडी गल्ली, गंगापूर १, नूतन कॉलनी, गंगापूर १, संभाजीनगर, वैजापूर १, देशपांडे गल्ली, वैजापूर १, टिळक रोड, वैजापूर १, धरणग्रस्तनगर, वैजापूर १, वंजारगाव २, भाटीया गल्ली, वैजापूर १, घायगाव १, मेन रोड, खंडाळा, वैजापूर ४, खालचा पाडा, शिऊर, वैजापूर ३,पिंप्रीराजा १, हरसवाडी १, रांजणगाव शेणपूजी १, फुलेनगर, गंगापूर १, जोगेश्वरी, गंगापूर १, धोंदलगाव, वैजापूर १, पैठण १, जळगाव १, घाणेगाव १, देवगाव, कन्नड १, शरणापूर, दादेगाव १, भारत नगर,सिल्लोड १, औरंगाबाद १७, फुलंब्री १, गंगापूर ४, खुलताबाद १, सिल्लोड २, वैजापूर ३, पैठण ४, सोयगाव १७ सिटी एंट्री पॉइंटवरील रुग्ण ए.एस क्लब २, बन्सीलालनगर १, एकतानगर ४, एन बारा २ , वाळूज १,चिकलठाणा २, बिडकीन ४, अन्य ९, एकतुनी १, सावखेडा १, एल अँड कंपनी परिसर ६, पाटोदा २, बिडकीन १, नक्षत्रवाडी ३, रामनगर १, ठाकरेनगर १, करमाड १, ब्रिजवाडी १, सिल्लोड ५, बजाजनगर २, बाबरा १, फुलंब्री ३, सावंगी ३, रांजणगाव ३, वैजापूर १, जोगेश्वरी १, सिडको १, कन्नड २, पडेगाव १, गंगापूर २, मिटमिटा १.

Web Title: coronavirus: 335 patients tested positive in Aurangabad district on Thursday; Death of 6 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.