Corona Virus: Shocking! Corona's report negative; However, the woman died during treatment | Corona Virus : धक्कादायक ! कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह; मात्र उपचारा दरम्यान महिलेचा मृत्यू

Corona Virus : धक्कादायक ! कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह; मात्र उपचारा दरम्यान महिलेचा मृत्यू

ठळक मुद्देताप, दम लागणे या लक्षणामुळे उपचार सुरू होते

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात कोरोनाच्या संशयावरून दाखल झालेल्या एका महिलेचा अहवाल निगेटिव्ह आला, मात्र या महिलेचा  मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती रविवारी समोर आली. 

घाटीत एक महिला दाखल झाली. ताप, दम लागणे अशा लक्षणांमुळे कोरोनाच्या संशयावरून या महिलेच्या लाळेचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला. तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. परंतु शनिवारी  महिलेचा मृत्यू झाला. या घटनेने सदर महिलेचा तपासणी अहवाल काय येतो, याकडे घाटी प्रशासनचे लक्ष लागले होते. अखेर या महिलेचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

Web Title: Corona Virus: Shocking! Corona's report negative; However, the woman died during treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.