महाविद्यालयीन तरूण ड्रग तस्करांचे ग्राहक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 11:43 AM2020-10-03T11:43:29+5:302020-10-03T11:43:56+5:30

औरंगाबाद :  पोलिसांनी पकडलेल्या मेफेड्रोन आणि चरस तस्करांचे औरंगाबाद शहरात १२ ते १५ ग्राहक असल्याची माहिती समोर आली असून यातील  बहुतेक ग्राहक हे मोठ्या घरांतील महाविद्यालयीन तरूण आहेत. अटकेतील आरोपी मात्र त्यांच्या ग्राहकांची नावे सांगत नसल्यामुळे  पोलिसांनी  त्यांच्या कॉल डिटेल्सच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे. वेदांतनगर पोलिसांनी दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी मुंबईहून चारचाकी गाडीद्वारे मेफेड्रोन आणि चरस या अमली पदार्थांसह शहरात आलेलया आशिक अली मुसा कुरेशी आणि नुरोद्दीन बद्रोद्दीन यांना पकडले. त्यांच्याकडून २५ ग्रॅम चरस आणि १० ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले होते. यानंतर त्यांचे स्थानिक  खरेदीदारही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. शहरात त्यांचे १२ ते १५ नियमित ग्राहक असून प्रति १० ग्रॅम मेफेड्रोनकरिता ते ग्राहकांकडून ४ ते ५ हजार  ...

Consumers of college young drug smugglers | महाविद्यालयीन तरूण ड्रग तस्करांचे ग्राहक

महाविद्यालयीन तरूण ड्रग तस्करांचे ग्राहक

googlenewsNext

औरंगाबाद : पोलिसांनी पकडलेल्या मेफेड्रोन आणि चरस तस्करांचे औरंगाबाद शहरात १२ ते १५ ग्राहक असल्याची माहिती समोर आली असून यातील  बहुतेक ग्राहक हे मोठ्या घरांतील महाविद्यालयीन तरूण आहेत. अटकेतील आरोपी मात्र त्यांच्या ग्राहकांची नावे सांगत नसल्यामुळे पोलिसांनी  त्यांच्या कॉल डिटेल्सच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे.

वेदांतनगर पोलिसांनी दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी मुंबईहून चारचाकी गाडीद्वारे मेफेड्रोन आणि चरस या अमली पदार्थांसह शहरात आलेलया आशिक अली मुसा कुरेशी आणि नुरोद्दीन बद्रोद्दीन यांना पकडले. त्यांच्याकडून २५ ग्रॅम चरस आणि १० ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले होते. यानंतर त्यांचे स्थानिक  खरेदीदारही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. शहरात त्यांचे १२ ते १५ नियमित ग्राहक असून प्रति १० ग्रॅम मेफेड्रोनकरिता ते ग्राहकांकडून ४ ते ५ हजार  रूपये उकळतात. या नशेखोरांची नावे मात्र ते पोलिसांना देत नसल्याचे  पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांनी सांगितले. 

मुंबई, पुण्याप्रमाणेच औरंगाबाद शहरात बड्या बापांची तरूण मुले अनेक वर्षांपासून हायप्रोफाईल नशा करतात, असे निवृत्त पोलीस उपाधीक्षक  डॉ.  कांचनकुमार चाटे यांनी सांगितले. मेफेड्रॉन, गांजा आणि चरस असे अमली पदार्थ बाळगणाऱ्यास  दहा वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.  अशा केसमधील  आरोपींना वर्षभर न्यायालय जामीनही देत नाही. 

Web Title: Consumers of college young drug smugglers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.