मराठवाड्यात ४२ ठिकाणी ढगफुटी; २० लाख ३९ हजार शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 01:25 PM2021-09-15T13:25:28+5:302021-09-15T13:28:55+5:30

Heavy RainFall in Marathawada : ढगफुटीप्रमाणे पाऊस बरसला असून, विभागातील ७० हून अधिक मंडळांत १०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस नोंदविला गेला आहे.

Cloudburst at 42 places in Marathwada; Massive loss of 20 lakh 39 thousand farmers | मराठवाड्यात ४२ ठिकाणी ढगफुटी; २० लाख ३९ हजार शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

मराठवाड्यात ४२ ठिकाणी ढगफुटी; २० लाख ३९ हजार शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

googlenewsNext
ठळक मुद्देआतापर्यंत १९ टक्के पंचनामे पूर्ण झाले २ लाख ७० हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पथके

औरंगाबाद : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे ( Heavy RainFall in Marathawada) २० लाख ३९ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची या महिन्याच्या १४ तारखेपर्यंतची आकडेवारी समोर आली आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम विभागीय पातळीवर सुरू असून, आजवर १९ टक्के शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. २ लाख ७० हजार शेतकऱ्यांपर्यंत महसूल, कृषी विभागाची पथके पोहोचली आहेत. ( Cloudburst at 42 places in Marathwada; Massive loss of 20 lakh 39 thousand farmers) 

हेक्टरचा विचार केला तर २५ लाख हेक्टरहून अधिक जमिनीवरील खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, पंचनाम्याअंती किती हेक्टवरील पिके वाया गेली, त्याचा अहवाल समोर येईल, असे सूत्रांनी सांगितले. १ सप्टेंबरपासून आजवर कमी-अधिक प्रमाणात विभागात अतिवृष्टी झाली. सुमारे २५० मंडळांत पावसाने दाणादाण उडवून दिली. यात कापूस, मका, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ढगफुटीप्रमाणे पाऊस बरसला असून, विभागातील ७० हून अधिक मंडळांत १०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस नोंदविला गेला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या हाती येणारे पीक वाया गेले. त्याचे पंचनामे करण्याचे काम सध्या सुरू आहे.

४२ ठिकाणी ढगफुटी; मराठवाडा हादरला
७ सप्टेंबर रोजी राज्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला. मराठवाड्यात सर्वाधिक ४२ हून अधिक ठिकाणी असा पाऊस एकाच दिवसात झाला. या पावसामुळे जीवितहानी झाली, पशुधनाचे नुकसान झाले. शिवाय घरांची पडझड, रस्ते, पूल खचले. मराठवाड्यात लाखो एकर शेतीचे क्षेत्र उद्ध्वस्त झाले. कापूस, तूर, मूग, मका, सोयाबीन, बाजरीसह फळबागांचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीची आगाऊ सूचना मिळावी, यासाठी डॉप्लर रडार विभागात बसविणे आवश्यक आहे. वित्त व जीवितहानी तसेच शेतीचे नुकसान टाळण्यासाठी डॉप्लर रडार मराठवाड्यात तातडीने बसविणे गरज असल्याचे हवामान तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.

जिल्हा-----बाधित शेतकरी---- झालेले पंचनामे---टक्केवारी

औरंगाबाद-- ३२६९३५ ------ २९३२८-------१७ टक्के

जालना----२६१२९८------ २६०६३-------११ टक्के

परभणी---२२२७९४ ------ २२९४४-------१४ टक्के

हिंगोली---११५०० ------ १०२५--------११ टक्के

नांदेड----४५१५८८------- २९६७२-------०७ टक्के

बीड-----७३७२२५----- १५०६६०------२९ टक्के

लातूर----८४९० ------ २५७४--------४० टक्के

उस्मानानाबाद--१९२२८------ ८४६०--------८० टक्के

एकूण -----२०३९६८८-----२७०७२७--------१८ टक्के

Web Title: Cloudburst at 42 places in Marathwada; Massive loss of 20 lakh 39 thousand farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.