City bus driver beaten by rickshaw driver | सिटी बस चालकाला रिक्षा चालकाची मारहाण; बस सेवा ठप्प

सिटी बस चालकाला रिक्षा चालकाची मारहाण; बस सेवा ठप्प

औरंगाबाद : सिडको बस स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर  रिक्षा चालकाकडून सिटी बस चालकाला मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी सात वाजता घडली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या सिटी बस चालकांनी एकत्र येत बस सेवा बंद ठेवली.

मुकुंदवाडी डेपोतून सिडको बस स्थानकात रांजणगाव ला जाणारी बस दाखल होत होती. त्याचवेळी प्रवेशद्वारासमोर एक रिक्षा आडवी आली. तेव्हा सिटी बस चालकाने रिक्षा हटवण्याची सूचना केली. यावरून झालेल्या वादात रिक्षाचालकाने सिटी बस सिटी बस चालकाला मारहाण केली. ही बाब समजताच सर्व सिटीबस सिडको बस स्थानकात उभ्या करण्यात आल्या.

Web Title: City bus driver beaten by rickshaw driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.