भोगले ऑटोमोटिव्ह हल्ला प्रकरण : कामगाराने बाजू मांडली; तब्बल २२ दिवस पार्किंगमध्ये बसवून ठेवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 11:40 AM2021-08-12T11:40:31+5:302021-08-12T11:44:26+5:30

Bhogle automotive attack case in Aurangabad : भाेगले ऑटोमोटिव्ह कंपनीतील कामगार सचिन गायकवाड यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे त्यांच्या मेहुण्यांसह रिपब्लिक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कंपनी मालकासह अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा प्रकार रविवारी घडला होता.

Bhogle automotive attack case: worker defends; I was kept in the parking lot for 22 days | भोगले ऑटोमोटिव्ह हल्ला प्रकरण : कामगाराने बाजू मांडली; तब्बल २२ दिवस पार्किंगमध्ये बसवून ठेवले

भोगले ऑटोमोटिव्ह हल्ला प्रकरण : कामगाराने बाजू मांडली; तब्बल २२ दिवस पार्किंगमध्ये बसवून ठेवले

googlenewsNext
ठळक मुद्देघटनेपूर्वीच कामगाराचे कंपनी मालक, कामगार उपायुक्तांना लेखी निवेदन नित्यानंद जयंत भोगले यांनी एका संघटनेतून दुसऱ्या संघटनेत का जातो, असे म्हणून कंपनीत येण्यास बंदी घातली. तुला आता काढून टाकणार, असे सांगितले. त्यामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे गायकवाड यांचे म्हणणे आहे.

औरंगाबाद : रेल्वे स्टेशन एमआयडीसीतील भोगले ऑटोमोटिव्ह कंपनीत पूर्णवेळ नोकरीला असलेले कामगार सचिन उत्तम गायकवाड यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात कंपनी मालकाच्या आदेशानुसार १३ जुलैपासून ८ ऑगस्ट रोजी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करेपर्यंत कंपनीत कामाला घेतले नाही. पार्किंगमध्येच बसून होतो, असा दावा केला आहे. (  worker defends; I was kept in the parking lot for 22 days ) 

भाेगले ऑटोमोटिव्ह कंपनीतील कामगार सचिन गायकवाड यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे त्यांच्या मेहुण्यांसह रिपब्लिक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कंपनी मालकासह अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा प्रकार रविवारी घडला होता. त्या प्रकरणात कंपनीच्या तक्रारीवरून सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून, त्यांना २४ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. या घटनेनंतर उद्योजकांवरील हल्ल्यांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यात कामगाराची बाजूही जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

हेही वाचा - एमआयडीसीत गुंडांचा धुडगूस; औरंगाबादच्या उद्योग क्षेत्रात दहशतीचे वातावरण

सचिन गायकवाड यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, गायकवाड हे भोगले कंपनीत मागील दहा वर्षांपासून स्प्रे पेंटिंगचे काम करीत आहेत. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नित्यानंद जयंत भोगले यांनी एका संघटनेतून दुसऱ्या संघटनेत का जातो, असे म्हणून १३ जुलैपासून कंपनीत येण्यास बंदी घातली. त्यामुळे वॉचमनने कंपनीमध्ये जाऊ दिले नाही. त्यामुळे तेव्हापासून ८ ऑगस्टपर्यंत कामाच्या वेळेत पार्किंगमध्ये बसून होतो. ८ ऑगस्ट रोजी दीड वाजेच्या सुमारास नित्यानंद भोसले यांनी पार्किगमध्ये येत मी छळ केल्याची तक्रार पोलीस आयुक्तांकडे का केली, असे विचारत तुला कंपनीत कामावर ठेवणार नाही. तुला आता काढून टाकणार, असे सांगितले. त्यामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे गायकवाड यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा - एमआयडीसीत गुंडगिरी वाढली; कंत्राट देण्याच्या कारणावरून व्यवस्थापकाला रस्त्यात अडवून मारहाण

बोलायचे नाही
याविषयी नित्यानंद भोगले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, संबंधित कामगाराने केलेल्या तक्रारींची कल्पना असल्याचे सांगितले. मात्र कामगाराच्या तक्रारीविषयी मला काही बोलायचे नाही. सर्व काही बोलण्याचे अधिकार रामभाऊ (राम भोगले) यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Bhogle automotive attack case: worker defends; I was kept in the parking lot for 22 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.