Aurangabad-Jalna has increased the percentage of voters of the local self government organization | औरंगाबाद- जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारांचा ‘टक्का’ वाढला
औरंगाबाद- जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारांचा ‘टक्का’ वाढला

ठळक मुद्देयुतीचा आकडा वजनदारएकूण ६१६ मतदार

- विकास राऊत 

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारांची संख्या वाढली असून, या मतदारसंघाच्या मैदानात उतरण्यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आॅगस्ट महिन्यात ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. शिवसेना-भाजप युती झाल्यास त्यांच्याकडील नगरसेवक सदस्यांचा आकडा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत वजनदार आहे. युतीकडे २९८, आघाडीकडे २५०, एमआयएम व अपक्ष मिळून एकूण ६१६ मतदार आहेत. मागील निवडणुकीत ४८० च्या आसपास मतदार होते. येणाऱ्या निवडणुकीत सेना-भाजप युती आणि काँगे्रस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार मैदानात उतरण्याची शक्यता आहे. सध्या काँगे्रसकडे हा मतदारसंघ असून, आ. सुभाष झांबड त्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यात मनपा, नपा, जि.प.मधील ३६१ मतदार आहेत, तर जालना जिल्ह्यात जि.प., न.प. मिळून २५५ मतदार आहेत. एकूण ६१६ मतदारांची संख्या आहे. ६८ मतदार इतर अपक्ष व इतर पक्षांचे आहेत. नव्याने झालेल्या नगरपालिका आणि नगर पंचायतींमुळे १२० च्या आसपास सदस्य संख्या वाढली आहे, तर औरंगाबाद पालिकेतही १६ मतदार सदस्य वाढले आहेत. त्यामुळे आॅगस्ट महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी होणारी निवडणूक उमेदवारांना बजेटच्या आवाक्याबाहेर घेऊन जाणारी ठरण्याची चिन्हे आहेत. पक्ष म्हणून विचार केला, तर १६७ सदस्य कॉँग्रेसकडे आहेत. त्याखालोखाल भाजपकडे १५९, तर शिवसेनेकडे १३९ मतदार सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे ८३, तर एमआयएमकडे २७ च्या आसपास मतदार सदस्य असल्याचा आकडा इच्छुकांकडे नोंद आहे. ४१ मतदार इतर पक्षांचे व अपक्षांचे आहेत. 

उमेदवारीसाठी सर्वांचे प्रयत्न 
हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे, त्यामुळे सेनेकडून कुणाला उमेदवारी मिळते. याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. ज्याचे जास्त सदस्य त्याच्याकडे मतदारसंघ या आधारावर भाजपही मतदारसंघावर दावा करण्याच्या विचारात आहे. बाहेरून उमेदवार मिळण्याबाबत चर्चा सुरू आहे. या निवडणुकीत पसंतीनुसार मतदान होत असते.४ पहिल्या पसंतीची मते सेना-भाजप युतीकडे जास्त आहेत. सध्या राष्ट्रवादी पक्षात नावापुरते कार्यरत असलेले शिवसेना-भाजपकडून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. त्या अनुषंगाने राष्ट्रवादीतील काहींनी कामदेखील सुरू केले असून, शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत स्नेहभोजन सुरू केले आहे, तसेच दुष्काळी मदतीसाठी हातभार लावण्यास सुरुवात केली आहे. ४भाजप आणि शिवसेनेकडून प्रत्येकी दोन जण इच्छुक असून, त्यांनी आकडेमोड सुरू केली आहे. शिवसेना आणि भाजप असे मिळून पहिल्या पसंतीच्या मतांची गोळाबेरीज होत असली तरी तगडे अर्थकारण करणारा उमेदवार या निवडणुकीत बाजी मारील. राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये येण्याची काही जणांनी तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. 


Web Title: Aurangabad-Jalna has increased the percentage of voters of the local self government organization
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.