आपत्ती व्यवस्थापनासाठी यंत्रणांनी सज्ज राहण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 10:52 PM2019-05-27T22:52:28+5:302019-05-27T22:53:26+5:30

औरंगाबाद : मान्सूनच्या तोंडावर अतिवृष्टी, पूर, दरड कोसळणे आदी नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी तालुका, जिल्हास्तरावरील संबंधित यंत्रणांनी सज्ज राहण्याचे ...

Arrangement for the system to be prepared for disaster management | आपत्ती व्यवस्थापनासाठी यंत्रणांनी सज्ज राहण्याचे आदेश

आपत्ती व्यवस्थापनासाठी यंत्रणांनी सज्ज राहण्याचे आदेश

googlenewsNext
ठळक मुद्देमान्सूनपूर्व आढावा : जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागांची घेतली बैठक


औरंगाबाद : मान्सूनच्या तोंडावर अतिवृष्टी, पूर, दरड कोसळणे आदी नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी तालुका, जिल्हास्तरावरील संबंधित यंत्रणांनी सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सोमवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सून-२०१९ नैसर्गिक आपत्तीसंदर्भात करावयाच्या उपाययोजनांची आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्ह्यातील पूर, अतिवृष्टीमुळे संपर्क तुटणे, दरड कोसळणे आदी घटना घडल्यास त्याची माहिती संकलित केली जावी. त्यानंतर त्याठिकाणी संरक्षक जॅकेट, बोटी, इतर प्रतिबंधात्मक साधनसामुग्री तयार ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाययोजना प्रभावीरीत्या राबवीत तालुका तसेच जिल्हास्तरावरील नियंत्रण कक्ष सुविधांसह तयार ठेवणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
वैजापूर, पैठण, गंगापूर तालुक्यांतील नदीकाठच्या भागात पोहण्याचा सराव असणाºया जलतरणपटूंचा संघ तयार ठेवावा. अतिवृष्टीमुळे संपर्क तुटणाºया गावांत तीन महिने पुरेल इतका धान्यसाठा उपलब्ध करून द्यावा. अतिवृष्टीमुळे, पुराच्या पाण्यामुळे उद्भवणाºया परिस्थितीत जीवित संरक्षणासाठी शाळा, समाजमंदिरे इतर सुरक्षित ठिकाणे तयार ठेवावीत.
वीज, गारपीट, पाणी वसाहतींमध्ये शिरणे या दुर्घटनांचे तात्काळ पंचनामे करावेत. सर्व गटविकास अधिकाºयांनी नदीपात्राची मर्यादा रेषा (ब्ल्यूलाईन) पार करून नदीपात्रात अतिक्रमित केलेल्या घरे, झोपड्या त्वरित काढाव्यात. आरोग्य सेवा, कायदा- सुव्यवस्था आवश्यक मदतकार्य तातडीने उपलब्ध करून देण्यास प्रथम प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी संबंधित अधिकाºयांना दिले. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगर परिषद, सिंचन, कृषी, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, वन विभाग, पुरवठा विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
साधनसामुग्रीचा आढावा
जिल्ह्यात पूर परिस्थिती उद्भवल्यास १३ बोटी, इल्फाटेबल लायटिंग (एकू ण) टॉवर १०, लाईफ जॅकेट १७७, लाईफ बोया ६२, सेल्फी हेल्मेट, सर्च लाईट १८, जेसीबी, काँक्रीट कटर १, फोल्डिंग स्ट्रेचर ७, वुडकटर, फोम जनरेटर, फायर टेंडर व इतर साधनसामुग्रीबाबत बैठकीत आढावा घेण्यात आला.
------------

Web Title: Arrangement for the system to be prepared for disaster management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.