876 patients corona free in a single day | एकाच दिवसात ८७६ रूग्ण कोरोनामुक्त

एकाच दिवसात ८७६ रूग्ण कोरोनामुक्त

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी एका दिवसात कोरोनामुक्त होणाऱ्या रूग्णांची विक्रमी संख्या नोंदविण्यात आली आहे.  बुधवार दि.  ३०  सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील तब्बल ८७६ रूग्ण कोरोनामुक्त  होऊन घरी परतले आहेत. तर २३७ रूग्णांना कोरोनाची  नव्याने लागण झाली असून ७  रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रूग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रूग्णांची संख्या अधिक आहे. बुधवारी आढळून  आलेल्या २३७  रूग्णांपैकी  ८५ रूग्ण ग्रामीण भागातील आहेत, ८३ रूग्ण मनपा हद्दीतील आहेत तर अन्य ६९ रूग्णांचा  समावेश आहे. यासोबतच जिल्ह्यातील  एकूण  कोरोनाबाधितांची संख्या ३३, ६८४ झाली असून या रूग्णांपैकी २७, ५०० रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९३८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.  सध्या जिल्ह्यात ५, २१० रूग्णांवर उपचार सुरू आहेत. 

Web Title: 876 patients corona free in a single day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.